मुंबई महापालिका आयुक्तांनी केले राज्यातील महापालिका आयुक्तांना मार्गदर्शन

राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांशी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी संवाद साधला.

102

कोविड–१९ साथरोगास प्रतिबंध करण्यासह कोविडची बाधा झालेल्या रुग्णांना वेळेत योग्य ते औषधोपचार मिळावेत, यासाठी मुंबईकरांच्या सहकार्याने मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वस्तरीय उपाययोजनांची दखल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्यासह देशभरातील विविध यंत्रणांनी व जगातील विविध संस्थांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या या सर्वस्तरीय व सर्वंकष प्रयत्नांची माहिती राज्यातील इतर महापालिकांना देखील व्हावी, या हेतूने राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांशी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी संवाद साधला. या संवादादरम्यान महापालिका आयुक्तांनी मुंबईत राबवलेल्या विविध उपाययोजनांची, नियोजनाची व अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. तसेच या अनुषंगाने विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे उदाहरणांसहीत देऊन मार्गदर्शन देखील केले.

काय म्हणाले आयुक्त?

संगणकीय दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सदर विशेष बैठकीला राज्यातील विविध महापालिकांचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान आजवरच्या सर्व उपाययोजनांची माहिती देताना, मुंबईतील बाधित रुग्णांसह त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी वेळच्या वेळी होऊन त्यापैकी ‘पॉझिटिव्ह’ चाचणी अहवाल हे महापालिकेकडे निर्धारित वेळेत उपलब्ध व्हावेत. तर यापैकी ज्यांना गरज असेल त्यांना महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात किंवा जंबो फॅसिलिटी असलेल्या उपचार केंद्रात वेळच्या वेळी ‘बेड’ उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागस्तरीय ‘वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या विकेंद्रीत व्यवस्थापनामुळे गरजूंना त्यांच्या परिसरा निकटच्या रुग्णालयात ‘बेड’ मिळण्याची शक्यता दुणावण्यासह तुलनेने अधिक लवकर उपचार सुरू होण्यास गती मिळाली. याबरोरबच ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध, त्यांच्यावरील उपचार यंत्रणा, बाधित रुग्ण आढळून आलेले कंटेन्मेंट झोन आदींबाबतची माहिती दिली.

(हेही वाचाः मुंबईत कडक निर्बंधात काय असणार दुकानांच्या वेळा? महापालिकेचे निर्देश)

लोकप्रतिनिधींचे सहकार्य

महापालिकेच्या २४ विभागांमध्ये अव्याहतपणे कार्यरत असणा-या प्रत्येक वॉर्ड वॉर रुम मध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सहाय्यक इत्यादी दिवसाचे २४ तास कार्यरत असतात. त्याचबरोबर प्रत्येक वॉर्ड वॉर रुमसाठी साधारणपणे प्रत्येकी १० एवढ्या संख्येने रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मुंबईतील कोविड-१९ची रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची अभियान स्वरुपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम मुंबई महापालिकेने हाती घेतला. या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

डॉक्टर व वैद्यकीय कर्मचा-यांशी संवाद साधणे गरजेचे

महापालिकेच्या स्तरावर कार्यरत असणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र कार्यदायित्व सोपवणे गरजेचे असून, चांगल्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एकच काम अनेक व्यक्तींना देणे कटाक्षाने टाळायला हवे, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. प्रशासकीय स्तरावर काम करत असताना महापालिकेने लोकप्रतिनिधींसह सर्वच मान्यवर लोकप्रतिनिधींशी आदराने संवाद साधणे व आपुलकी निर्माण करणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्तांनी नमूद केले. कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाशी लढा देत असताना आपल्या सहका-यांशी व विशेषतः डॉक्टरांशी, वैद्यकीय कर्मचा-यांशी आपुलकीने संवाद साधणे, अत्यंत गरजेचे व उपयोगी असल्याचे महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केले.

(हेही वाचाः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.