- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ही बाब मार्गी लावून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. आयुक्तांनी ही भत्त्याची थकीत रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाला निर्देश दिले असले तरी एक महिना उलटूनही याबाबत अद्याप परिपत्रक जारी करण्यात आले नाही त्यामुळे ज्याची अंमलबजावणी प्रशासनाला करता येत नाही अशा आयुक्तांच्या निर्देशाचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाब देखील आता मार्गी लागली. महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही प्रशासकीय मंजुरी प्रदान केली.
(हेही वाचा – Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला )
भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल असे मागील २९ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केले होते. यानंतर काही कामगार संघटना यांनी गणपती पूर्वी विविध भत्त्यातील वाढीचा लाभ मिळेल असे जाहीर केले होते. त्यामुळे कर्मचारी वर्ग गणेशोत्सवात याचा लाभ मिळेल या विचारात होते. पण गणपती होवून पितृ पक्ष संपत आला तरी यावर प्रशासनाला याबाबतची कार्यवाही करता आलेली नाही. तब्बल एक महिना उलटत आला तरी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात न आल्याने कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (BMC)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=COrtUQ7pvnA
Join Our WhatsApp Community