BMC : उद्यान, खेळाच्या मैदानांच्या नव्या धोरणाला काँग्रेसने दर्शवला विरोध, माजी विरोधी पक्षनेत्यांनी ‘ही’ मांडली बाजू

206
BMC : उद्यान, खेळाच्या मैदानांच्या नव्या धोरणाला काँग्रेसने दर्शवला विरोध, माजी विरोधी पक्षनेत्यांनी 'ही' मांडली बाजू
BMC : उद्यान, खेळाच्या मैदानांच्या नव्या धोरणाला काँग्रेसने दर्शवला विरोध, माजी विरोधी पक्षनेत्यांनी 'ही' मांडली बाजू

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिका प्रशासनाने ११ महिने ते दीर्घकालावधींसाठी काळजीवाहू ते दत्तक तत्वावर स्वतःच्या ताब्यातील मोकळे भूखंड द्यायचे ठरवून याबाबतच्या धोरणाबाबत जनतेच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत. (BMC) मात्र, या धोरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मुळात स्वतःच्या मोकळ्या जागा खाजगी संस्था तथा व्यक्तींच्या ताब्यात का द्यायच्या, असा सवाल करत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या धोरणाला काँग्रेस पक्षाचा विरोध असल्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले.

(हेही वाचा – Sanskrit In Madrasa : ‘या’ राज्यातील मदरशांत मिळणार संस्कृतचे धडे)

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्यावतीने विरोध दर्शवताना अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. त्याचा महापालिकेचा अनुभव हा चांगला नाही. मागच्या वेळेस काळजीवाहू तत्वावर जे भूखंड दिले, त्यातील २७ भूखंड महापालिकेला परत मिळवता आलेले नाहीत. हे भूखंड परत मिळवण्यासाठी महापालिका पुन्हा कोट्यवधी रुपये मोजणार आहे. जे चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BMC)

सन २०१६ ला पण अशाच प्रकारे धोरण आले होते, ज्याला तत्कालिन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. भूखंड या आधी खाजगी संस्थांना दिले गेले, त्यावर क्लब, जिमखाने उभारून सामान्य मुंबईकराला प्रवेश नाकारला गेला. यावेळेसही असेच होईल. असे सांगत राजा यांनी हा निर्णय अजिबात मुंबईकरांच्या हिताचा नाही की, महापालिकेच्या हिताचा आहे. हा निर्णय काही व्यक्ती आणि संस्थांच्या हितासाठी घेतला जातोय ,असे दिसते असा आरोप त्यांनी केला. (BMC)

मुंबई महापालिका जर सुशोभीकरणावर १६०० कोटी खर्च करू शकते, तर भूखंड राखणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे, यासाठी नक्कीच खर्च करू शकते. मुळात महापालिका बरखास्त असताना प्रशासकाने इतका महत्त्वाचा निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासकांना नक्की कसली घाई झालेली आहे असा सवाल करत त्याऐवजी महापालिकानंतर लोकनियुक्त प्रतिनिधींना योग्य तो निर्णय घेऊ दे, असे सांगत काँग्रेस पक्ष या मनमानी निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.