- सचिन धानजी, मुंबई
दादरमध्ये आयटी पार्कच्या नावाखाली बांधलेल्या इमारतीमधील घरांचा तथा गाळ्यांचा प्रत्यक्ष वापर अन्य कामांसाठी केला जात असल्याने जागेच्या गैरवापराची प्रकरणे समोर आल्याने महापालिकेने या भागातील चार ते पाच इमारतींमधील गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. जागेचा गैरवापर केल्यामुळे सध्या चार इमारतींना नोटीस जारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात अशाप्रकारे आयटी पार्कच्या नावाखाली बांधलेल्या सर्वच इमारती आता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. त्यामुळे दादर पश्चिम भागातील सर्वच इमारतींची झाडाझडी घेण्यासाठी सुरुवात केली जाणार असून अशाप्रकारे वापर होत असलेल्या इमारतींना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (BMC)
(हेही वाचा – ACB Raid in Vasai: पालघरमध्ये वनक्षेत्रपालाच्या घरी आढळले मोठे घबाड; नेमके प्रकरण काय?)
दादर पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्गाला जोडणाऱ्या गॅरेज गल्ली परिसरातील भवानी प्लाझा, ओम ऍनेक्स, अटलांटिका प्लाझा आणि पलई कमर्शियल तसेच राम शाम वाडी या पाच इमारतींमध्ये आयटी पार्कच्या नावावर एफएसआयचा लाभ घेत बांधकाम केले. परंतु याठिकाणी प्रत्यक्षात आयटी संदर्भातील कार्यालयांऐवजी चक्क गारमेंट्स सुरु आहे. त्यामुळे या चार इमारतींमधील तब्बल ४५० गाळेधारकांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, यातील काहींनी पुरावे सादर केले असून त्यांची छाननी सुरु होती, परंतु यातील दोनशेहून अधिक गाळेधारकांनी अद्यापही कागदपत्रे सादर केलेली नसल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये कागदपत्रांचा पुरावा सादर न केल्यास गाळ्यांवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. (BMC)
(हेही वाचा – सत्तेतील भाजपाचा भक्कम पाया अटलजींनी घातला; Raj Thackeray यांचे पोस्टद्वारे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन)
महापालिकेने मागील वर्षी तक्रारींच्या अनुषंगाने या केवळ चार ते पाच इमारतींमध्ये आयटीच्या नावाखाली इमारतींचे बांधकाम करून एफएसआयचा लाभ घेतला असला तरी प्रत्यक्षात या सर्व बांधकामातील जागेचा वापर गारमेंट्ससह अन्य कामांसाठीच करत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने ४५० हून अधिक जणांना नोटीस बजावली असली तरी अशाप्रकारे दादर पश्चिम परिसरात अशाप्रकारे आयटी पार्कच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात इमारतींचे बांधकाम झालेले आहे. त्यामुळे सध्या पाच इमारतींमधील गाळेधारकांना जागेच्या गैरवापरासंदर्भात नोटीस जारी केल्या असल्या तरी अशाप्रकारच्या सर्वच इमारतींची झाडाझडती घेतली जावी अशी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. या झाडाझडती तसेच तक्रारींच्या आधारे त्या सर्वांना नोटीस जारी करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे जागेचा गैरवापर केला जात असल्याने त्या गाळेधारकाला तथा सदनिकेला आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या देयकातील रकमेच्या २०० पटीने दंड आकारणे अपेक्षित असतानाही आकारला जात नाही. त्यामुळे अशाप्रकारे केवळ आयटी च्या नावावर एफएसआयचा लाभ घेऊन याचे उल्लंघन करण्याचा प्रकार केवळ दादरमध्येच नाहीतर संपूर्णच मुंबईमध्ये झाला असल्याने अशाप्रकारे आयटी पार्कच्या नावाखाली बांधकाम झालेल्या सर्वच इमारतींची पाहणी करून जागेच्या गैरवापरासंदर्भात नोटीस पाठवून करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने दंडाची रक्कम आकारली जाणे अपेक्षित आहे. जेणेकरून महापालिकेच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढली जाईल, असे काही निवृत्त महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community