-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या कंत्राटी उपायुक्त (पायाभूत सुविधा) पदी असलेल्या उल्हास महाले यांचा कार्यभार १४ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर या रिक्त जागेचा आता अतिरिक्त कार्यभार उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या पदासाठी कायम उपायुक्ताची नेमणूक करणे आवश्यक असताना तसेच या पदासाठी जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांना उपायुक्त पदी बढती देऊन त्यांची यापदी नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजुरी मिळत नाही. उलट याला मंजुरी न देता उपायुक्त (पायाभूत सुविधा प्रकल्प) पदाचा अतिरिक्त कार्यभार भोळे यांच्याकडे सोपवल्यामुळे महाले यांना पुन्हा एकदा येण्याची संधी दिली जाणार आहे का, की कुणा तरी अधिकाऱ्याची वर्णी लावण्यासाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
(हेही वाचा – परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी पाश्चात्य देशांना सुनावले खडेबोल)
मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने आवश्यकता नसतानाही उल्हास महाले यांना सेवा निवृत्तीनंतर पुन्हा त्यांच्या त्याच उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदावर कंत्राटी तत्वावर सामावून घेतले. या कंत्राटी उपायुक्त पदाची नियुक्ती केवळ एक वर्षांकरता होता आणि याचा कालावधी १४ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे १३ मार्च २०२५ रोजी उल्हास महाले यांनी पदभार सोडला. त्यानंतर १७ मार्च रोजी उपायुक्त शशांक भोरे यांच्याकडे सोपवण्यात अला आहे. परंतु एक वर्ष सेवा निवृत्त झालेल्या महाले यांना कंत्राटी तत्वावर उपायुक्तपदी नेमल्यामुळे मागील वर्षभरात अनेक प्रमुख अभियंता पदावरून बढती मिळालेल्या उपायुक्तांना या पदाचा लाभ मिळू शकला नाही. परंतु आता महाले यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर यापदावर कायम उपायुक्ताची निवड होणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून पुन्हा कुणा अधिकाऱ्याला कंत्राटी पध्दतीवर येण्याच्या मार्ग खुला ठेवला आहे. तसेच कोणा एका अधिकाऱ्याला लाभ मिळावा यासाठी या पदावर अतिरिक्त पदाचा भार सोपवला आहे. (BMC)
(हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींच्या रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही; आमदार Ravindra Chavan यांची ग्वाही)
मागील काही दिवसांपूर्वी जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांचा प्रस्ताव तयार करून आयुक्त तथा प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून महाले यांच्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर उपायुक्तपदी बढती देवून माळवदे यांची वर्णी लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. परंतु प्रत्यक्षात याला मंजुरीच दिली जात नसून एका मर्जीतील प्रमुख अभियंत्याला उपायुक्तपदी बढती देऊन त्यांची वर्णी उपायुक्त (पायाभूत सुविधा प्रकल्प) पदी नियुक्ती करण्याचा विचार आहे. यासाठीचा दबाव आयुक्तांवर वाढल्याने उपायुक्त (पायाभूत सुविधा प्रकल्प) पदी कायम उपायुक्ताची नियुक्ती न करता भोरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने भोरे किंवा माळवदे किंवा अन्य कुणाही उपायुक्ताची या पदी तात्काळ नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून या पदावर कुणीही कंत्राटी तत्वावर दावा करणार नाही. तसेच यापदावरील उपायुक्तांचा दावा कायम राहिल, असे बोलले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community