BMC Corruption : महापालिकेत अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचार होतोय, भाजपाने केले मान्य

1551
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच

भाजपाचे मोहित कंबोज यांच्या महापालिका अतिरिक्त आयुक्तांविरोधात एक्सवरील पोस्टने खळबळ उडवून दिली असून हे सनदी अधिकारी कोण असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडणारा नक्की अतिरिक्त आयुक्त कोण याचा शोध कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. दरम्यान कंबोज याच्या या पोस्टमुळे महापालिकेत अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याची स्पष्ट कबुलीच अप्रत्यक्षपणे भाजपाकडून दिली जात आहे. (BMC Corruption)

भाजपाचे मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडियाच्या माध्यमाद्वारे मुंबईतील महापालिकेती अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. कंबोज यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मुंबई महापालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडत आहे. महापालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला असून त्यांचे तोंड म्हणजे गटार आहे. त्याला कंट्रोल करण्याची हीच वेळ असल्याचे म्हणणे आहे. (BMC Corruption)

(हेही वाचा – ‘एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल’, Mohit Kamboj यांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा!)

प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार सुरुच

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप भाजपाने वारंवार केला असून विविध कंत्राट कामांची चौकशीही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, महापालिका बरखास्त झाल्याने प्रशासक राजवट सुरु झाली असून राज्य सरकारच्या अधिपत्याखाली महापालिकेतील नियुक्त आयुक्त तथा प्रशासक हे काम करत आहेत. ७ मार्च २०२२मध्ये महापालिका संपुष्टात आल्यानंतर ठाकरे सरकारच्या अधिपत्याखाली काम करणारे प्रशासक आता विद्यमान शिंदे आणि फडणवीस सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहेत. (BMC Corruption)

मात्र, महापालिकेतील आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मर्जीतील असल्याने त्यांच्या सुचनेनुसारच प्रशासनाचे अधिकारी काम करत आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासक राजवट असताना कंबोज यांच्याकडून चअतिरिक्त आयुक्तांचे नाव न घेता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने एकप्रकारे प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधकांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता सरकारमधील घटक पक्ष आणि महायुतीतील पक्ष अशाप्रकारचा आरोप सार्वजनिक ठिकाणी करत असल्याने एकप्रकारे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधकांच्या आरोपांना दुजोरा देण्यासारखेच आहे. भाजपाच्या नेत्यांची कामे होत नाहीत आणि शिवसेनेची कामे होतात या भावनेने हे आरोप केले आहेत की शिवसेनेला अडचणीत आणण्याच्या दृष्टीकोनात हे आरोप केले. महायुती असताना मुख्यमंत्र्यांना याची कल्पना देऊनही ही तक्रार करता आली असती. परंतु कंबोज यांनी सार्वजनिक व्यासपीठावर हे आरोप केल्याने एकप्रकारे भाजपाचीच त्यांना साथ असल्याचे बोलले जात आहे. (BMC Corruption)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.