BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये दीपावली भेट

4331
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली-२०२४ निमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दीपावली-२०२४ करीता महानगरपालिका अधिकारी/कर्मकर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षी २६ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान मिळाले होते. यात यंदा ३ हजार रूपयांची वाढ मुख्यमंत्री यांनी जाहीर केली. (BMC)
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी यांना दीपावली-२०२४ प्रीत्यर्थ सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दीपावली-२०२४ करीता महानगरपालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे.  (BMC)
 या प्रकारे मिळणार सानुग्रह अनुदान
– महानगरपालिका अधिकारी/कर्मचारीः रुपये २९,०००/-
– अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारीः रुपये २९,०००/-
– महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये २९,०००/-
– माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
-माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
-अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते/शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
-अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००/-
-सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १२,०००/-
-बालवाडी शिक्षिका/मदतनीस – भाऊबीज भेट रुपये ०५,०००/- (BMC)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.