कोविड काळातील ४ हजार कोटींच्या खर्चाचा तपशील BMC कडे नाही

127

मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता; पण कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीतून मिळाली.

कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका (BMC) आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. त्यांचा अर्ज उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) यांच्याकडे हस्तांतरित केला. उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) लालचंद माने यांनी अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला. प्रशासकीय अधिकारी चि.गे. आढारी यांनी अर्ज प्रमुख लेखापाल ( वित्त) यांसकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला. एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असून केंद्रीय पथक आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी करत आहे तर दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त ४ हजार कोटींचा हिशेब देत नाही, ही बाब गंभीर आहे.

(हेही वाचा Israel-Palestine Conflict : हमासने रुग्णालयाच्या तळाशी बांधले भुयार; इस्रायल लष्कराने जारी केला व्हिडीओ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.