- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेला चित्रपट, नाटक, सर्कस आणि आनंद बाजार इत्यादींचे प्रयोग व खेळ यांच्यावर रंगभूमी कर (Theater Tax) आकारण्याचे अधिकार असले तरी प्रत्यक्षात सन २०१५-१६ पासून सुधारित प्रत्येक वर्षांसाठी १० टक्के रंगभूमी कर आकारण्यास महापालिकेची परवानगी मिळूनही आजतागायत प्रत्येक वर्षी या करात वाढ करूनही राज्य शासनाची अद्यापही याला मंजुरी मिळत नाही. त्यामुळे महापालिका दरवर्षी १० टक्के वाढ करत असली तरी राज्याच्या नगरविकास खात्याची परवानगी न मिळाल्याने प्रत्यक्षात आजही महापालिकेला जुन्याच दराने करमणूक शुल्क वसूल करण्याची वेळ आली आहे.
महापालिका प्रतिवर्षी निश्चित करेल त्याप्रमाणे आणि यापूर्वी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त नाही, अशा दराने महापालिकेला चित्रपट, नाटक, सर्कस, आनंद बाजार इत्यादी प्रयोग व खेळ यांच्यावर रंगभूमी कर (Theater Tax) आकारण्याचे अधिकार दिलेले आहेत. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी रंगभूमी कराच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेत याला महापालिकेने मंजुरी दिली आणि यापूर्वीची ठराव रद्द करण्यात आले.
(हेही वाचा – Assembly Winter Session : विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज आठ तासही चालले नाही!)
यापूर्वी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून रंगभूमी कराच्या (Theater Tax) दरात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका प्रशासकांनी मंजुरी दिली. त्यानंतर या ठरावाची प्रत फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य शासनाच्या मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला. तसेच या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळवण्यासाठी नगरविकास खात्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही याला नगरविकास खात्याने परवानगी दिलेली नाही.
राज्य शासनाच्या राजपत्रात रंगभूमी कराचे (Theater Tax) दर अधिसूचित करण्याबाबतच्या मंजुरीसाठी किती कालावधी लागेल, याबाबत अद्यापही निश्चित कालावधी सांगता येत नसल्याने व याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याने याला जेव्हा मंजुरी मिळेल त्या दिनांकापासून सुधारित दराने अंमलबजावणी करण्यात येईल असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षांकरताही जुन्याच दराने म्हणजेच सन २०१४-१५ प्रमाणे रंगभूमीकर आकारण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षांत म्हणजे सन २०२४-२५ या वर्षांतही चित्रपटगृहाच्या श्रेणीचा विचार न करता मुंबईतील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या मराठी व गुजराथी चित्रपटांना व रंगमंचावर अधिदानातून माफी देण्यात आलेली असल्याचे करनिर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सन २०२५-२६ या वर्षांकरता ही कर माफी व सवलत पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community