दादर, शिवडीत सुनील मोरे, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे यांचे काय होणार?

दादर पूर्व, शिवडी आणि परळ या एफ दक्षिण विभागात मागील निवडणुकीत दोन प्रभाग खुला आणि तीन महिला आरक्षित प्रवर्गासाठी राखीव झाला होता, तर एक प्रभाग अनुसूचित जाती महिला व ओबीसी आरक्षित प्रभागासाठी आरक्षित होते, परंतु आगामी निवडणुकीकरता पडलेल्या आरक्षणात या विभागात चार प्रभाग खुले झाले असून दोन महिला आणि एक प्रभाग अनुसूचित जाती करता आरक्षित झाला आहे. परंतु या आरक्षणाने काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे.

( हेही वाचा : पंतप्रधानांसमोरच राज्यपालांनी जाहीरपणे मांडले राज्य सरकारचे रिपोर्ट कार्ड!)

सुनील मोरे यांना आरक्षणाचा मोठा फटका

मागील निवडणुकीत अनुसूचित जाती महिला करता आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांचा प्रभाग आता महिला राखीव झाल्याने पुन्हा त्यांची त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सुप्रिया सुनील मोरे यांचा प्रभाग अनुसूचित जातीकरता राखीव झाल्याने सुनील मोरे यांना आता नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

तर तब्बल सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या श्रध्दा जाधव यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे श्रध्दा जाधव किंवा त्यांचा मुलगा युवा सेनेचे पदाधिकारी हे पवन जाधव यांचाही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पक्ष याठिकाणी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

सचिन पडवळ यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी

तर सिधु मसुरकर यांचा प्रभागही खुला झाला असून मसुरकर यांना आता पक्ष तिकीट देते की त्यांचा मुलाला संधी देते याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. तर अनिल कोकीळ यांचाही प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांचेही दुसऱ्या प्रभागात पुनर्वसन न झाल्यास घरी बसावे लागणार आहे. याशिवाय दत्ता पोंगडे यांचाही प्रभागही महिला आरक्षित झाल्याने त्यांनाही घरी बसण्याचा मार्ग दाखवला जावू शकतो. तर सचिन पडवळ यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

 • प्रभाग २०० अनुसूचित जाती महिला, (उर्मिला पांचाळ- शिवसेना) नवीन प्रभाग २०७, आरक्षण : महिला
  नवीन प्रभाग रचना : दादर शिंदे वाडी, दादर गुरुद्वारा, नायगाव,हिंदमाता, गौतम नगर, कोहिनूर मिल कंपाऊंड, कैलास मंदिर, दादर पादचारी पूल
 • प्रभाग २०१ महिला, (सुप्रिया मोरे- काँग्रेस) नवीन प्रभाग २०८, आरक्षण : अनुसूचित जाती
  नवीन प्रभाग रचना : नायगाव पोलिस वसाहत, शिवडी टी बी हॉस्पिटल, बीपीटी हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, कात्रक रोड, एचपीसीएल, झकेरिया बंदर रोड
 • प्रभाग २०२ महिला, (श्रध्दा जाधव- शिवसेना) नवीन प्रभाग २०९, आरक्षण : खुला
  नवीन प्रभाग रचना : गोलंजी टेकडी, आंबेरकर नगर, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, हाफकिन इंस्टिट्यूट, टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, सेंट झेवियर्स स्ट्रिट
 • प्रभाग २०३ महिला, (सिंधु मसुरकर- शिवसेना) नवीन प्रभाग २११, आरक्षण : खुला
  नवीन प्रभाग रचना : ग्लोबल हॉस्पिटल, अशोक टॉवर, आयकर कार्यालय, भारतमाता सिनेमा, करिरोड
 • प्रभाग २०४ खुला, (अनिल कोकीळ- शिवसेना) नवीन प्रभाग २१२, आरक्षण : महिला
  नवीन प्रभाग रचना : मिंट कॉलनी, लालबाग, महात्मा गांधी रुग्णालय, आंबेवाडी
 • प्रभाग २०५ खुला, (दत्ता पोंगडे- शिवसेना) नवीन प्रभाग २१३, आरक्षण : महिला
  नवीन प्रभाग रचना : अभ्युदय नगर,दोस्त प्लेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्यासुप्रिम, शिवडी नाका
 • प्रभाग २०६ओबीसी, (सचिन पडवळ- शिवसेना) नवीन प्रभाग २१४, आरक्षण : खुला
  नवीन प्रभाग रचना : शिवडी, शिवडी बस डेपो, टिळक नगर, झकेरिया बंदर, शिवडी किल्ला
 • वाढलेला नवीन प्रभाग क्रमांक २१०, आरक्षण : खुला प्रवर्ग
  नवीन प्रभाग रचना : टाटा मिल कंपाऊंड, आचार्य दोंदे मार्ग व जी डी आंबेकर मार्ग, भोईवाडा कोर्ट, परेल नाका ऑफिस, केईएम रुग्णालय, डॉ एस एस राव मार्ग, महादेव पालव मार्ग

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here