महापालिका निवडणूक : ओबीसीसह आरक्षण, महापालिकेला प्राप्त झाल्या ३९९ हरकती

मुंबई महानगरपालिका ‘सार्वत्रिक निवडणूक – २०२२च्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबाबत हरकती नोंदवण्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत संपुष्टात आली आहे. या शेवटच्या दिवसापर्यंत महापालिकेकडे या आरक्षणासंदर्भात ३९९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

एकूण ३९९ हरकती आणि सूचना प्राप्त

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मागील २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरी सोडतीनंतर ओबीसी आरक्षण काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जारी केल्यानंतर ओबीसीसही २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदविण्यासाठी २ ऑगस्ट २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली होती. या मुदतीत मुंबई महानगरपालिकेकडे एकूण ३९९ हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

( हेही वाचा : मुंबईत गुरुवारी संपूर्ण मुंबईत १५ टक्के तर, काही भागांत १०० टक्के पाणीकपात )

महापालिकेच्या या निवडणुकीतील २३६ प्रभागांपैंकी ५० टक्के अर्थात ११८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी १ व ओबीसी महिला प्रवर्गासाठी ३२ अशा ४१ आणि महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७७ प्रभाग राखीव ठेवून त्यानुसार त्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. तर उर्वरीत सर्व जागा खुल्या आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीकरता ०७, अनुसूचित जमातीकरता ०१, ओबीसी प्रवर्ग ३१ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ अशा प्रकारे एकूण ११८ प्रवर्ग आरक्षित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here