दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर आलेला असताना अद्यापही मुंबई महापालिकेच्या कामगारांच्या सानुग्रह अनुदान बाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सानुग्रह अनुदान किती मिळणार? कधी घोषणा होणार याच प्रतीक्षेत आणि विचारात महापालिका कर्मचारी होणार असून दिवाळी संपल्यानंतर ही रक्कम मिळणार का? त्यानंतर दिवाळीची खरेदी करायची का असा सवाल आता कर्मचाऱ्यांकडून खासगीत विचारले जात आहेत. (BMC Diwali Bonus)
मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना मागील दीपावलीची भेट म्हणून २२ हजार ५०० रूपये एवढी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात विद्यमान मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी म्हणजे २९ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर केले होते. त्यानंतर सानुग्रह अनुदानासंदर्भात १८ ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी झाले. म्हणजे प्रत्यक्षात घोषणा झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी याचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली.
पण यंदा १० नोव्हेंबर पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दीपावली आहे. त्यामुळे शुक्रवारी ३ तारीख असून कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची ही रक्कम आठ दिवस आधी जमा झाली तरच त्यांना सणाची खरेदी करून मुलाबाळांना कपडे व इतर साहित्य, वस्तू खरेदी करता येईल. पण या सणाला अवघे ९ ते १० शिल्लक राहिलेले असताना अद्यापही दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान देण्याची कोणतीही हालचाल सुरू नाही. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे स्वतः काही पुढाकार घेत याबाबत निर्णय घेत नाही की याची घोषणा करायला मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना वेळ आहे. त्यामुळे या दिवाळी भेट प्रत्यक्षात कधी मिळणार , त्यानंतर त्याचे परिपत्रक कधी काढले जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आणि आम्ही दिवाळीची खरेदी कधी करणार असे प्रश्न आता कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
(हेही वाचा :Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल)
मुंबई महापालिकेत चतुर्थी श्रेणी सह तृतीय श्रेणी यातील ५९ टक्के कर्मचाऱ्यांचे पगार कमी असून ते सर्व या सानुग्रह अनुदानाच्या रकमेवर अवलंबून असतात. त्यामुळे जर वेळेत याची घोषणा होवून त्याची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा न झाल्यास त्यांची दिवाळी खरेदी लांबणीवर पडेल किंवा या रकमेच्या भरवशावर त्यांना व्याजी पैसे घेवून हा सण साजरा करावा लागेल, असेही बोलले जात आहे. काही कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यंदा ५० हजार एवढी दिवाळी भेट मिळावी म्हणून मागणी केली आहे. परंतु २०२१ मध्ये तत्कालीन ठाकरे सरकारने १५,५०० रुपयांवरून ही रक्कम वाढवून २० हजार रुपये एवढी करून ती सन २०२३ पर्यंत राहील असे जाहीर केले होते. पण त्यानंतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा करार मोडून २२,५०० एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे यंदाही अडीच हजारांची वाढ गृहीत धरल्यास यंदा २५,००० रुपये दिवाळी भेट मिळेल असा अनुमान लावला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community