केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे १ जुलै २०२२ पासून महागाई भत्त्याचा तथा महागाई सहाय्याचा दर ३४ वरून ३८ टक्के प्रमाणे सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिका कर्मचा-यांना सध्या आकारण्यात येत असलेल्या महागाई भत्याच्या तथा महागाई सहाय्याच्या दरात ०१ जुलै २०२२ च्या प्रभावाने ही वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या थकबाकीसह ऑक्टोबर महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना ही रक्कम प्राप्त होणार आहे.
( हेही वाचा : चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत तीन जणांचा मृ्त्यू)
महानगरपालिका कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक तथा कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासन निर्णयाप्रमाणे ०१ जुलै २०२२ पासून महागाई भत्त्याचा तथा महागाई सहाय्याचा दर ३४ वरून ३८ टक्के प्रमाणे सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिका कर्मचा-यांना सध्या आकारण्यात येत असलेल्या महागाई भत्याच्या दरात ०१ जुलै २०२२ च्या प्रभावाने ही वाढ करण्यात येत आहे.
महागाई भत्ता तथा महागाई सहाय्य हे महानगरपालिका समय वेतनचेणीतील पूर्णकालिक कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असेल. मात्र, माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणा-या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार नाही.
संगणकाद्वारे सुधारित महागाई भत्त्याची महागाई सहाय्याची ऑक्टोबर २०२२ या महिन्यासाठीची आकारणी, तसेच जुलै ते सप्टेंबर २०२२ या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या ऑक्टोबर २०२२ च्या मासिक वेतन पत्रकात तथा निवृत्तीवेतनात आकारणी करण्याबाबतची कार्यवाही मानव संसाधन विभागामार्फत करण्यात येत आहे. महागाई भत्याची महागाई सहाय्याची रम परिगणित करताना सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन विचारात घेतले जाईल. सुधारित वेतन व व्यवसायरोध भत्ता यांच्या एकत्रित रकमेवर महागाई भत्ता तथा महागाई सहास्य आकारण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community