मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गटविमा ऐवजी स्वत:ची वैयक्तिक किंवा कुटुंबियांच्या आरोग्य विमा योजनेच्या प्रिमियम करता वार्षिक १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेने ही रक्कम देण्याचा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांनी प्रिमियमच्या रकमेची पावती सादर केल्यांनतर ही रक्कम मिळणार होती, परंतु आता ही रक्कम आगावू स्वरुपात कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
( हेही वाचा : बूस्टर डोससाठी प्रतीक्षा कालावधी झाला कमी! सरकारचा मोठा निर्णय )
रक्कम आगावू स्वरुपात देण्याचा विचार
वैद्यकीय गटविमा योजना खंडीत झाल्याने, कर्मचारी वैद्यकीय लाभापासून वंचित राहू नयेत, यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना वैद्यकीय गटविमा योजनेऐवजी स्वतःची वैयक्तिक किंवा कुटुंबियांसहित काढलेली किंवा स्वत:ची वैयक्तिक आणि कुटुंबियांची वेगळी यापैकी किमान रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त विमा संरक्षण असलेल्या वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम किंवा १५ हजार रुपये यापैंकी जी कमी असेल, त्या रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रस्ताव जानेवारी २०२२मध्ये स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गटविमा ऐवजी वैयक्तिक आरोग्य विम्याची १५ हजार रुपयांची रक्कम देण्याची प्रक्रिया राबवली जात असताना आता ही रक्कम आगावू स्वरुपात देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.
विम्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार
महापा लिका प्रशासनाच्यावतीने या आरोग्य विम्याची रक्कम आगावू स्वरुपात १५ हजार रुपये देण्यात येत असून ही रक्क्म दिल्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्येच भरलेल्या प्रिमियच्या रकमेची पावती सदर करणे आवश्यक आहे. जर तीन महिन्यांमध्ये या विम्याची प्रिमियम भरल्याची पावती सादर न केल्यास पुढील महिन्यात देण्यात आलेली १५ हजारांची रक्कम पगारातून कापून घेण्यात येईल, अशाप्रकारच्या अटींचा समावेश करण्यात येत आहे.
पहिल्यावर्षी १५ हजारांची रक्कम खात्यात जमा केली जाणार असून जर या १५ हजारांपेक्षा कमी रक्कमेच्या प्रिमियमची रक्कम असल्यास उर्वरीत रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात कापून घेतली जाईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांपासूनच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आरोग्य विम्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community