मुंबई महापालिकेत (BMC) मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त (शहर) या पदावर अखेर डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, डॉ. जोशी यांच्या नियुक्तीचे शासन आदेश गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी जारी होताच महापालिका आयुक्तांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे असलेल्या खात्यांची अदलाबदली करून टाकली. डॉ.जोशी यांनी पदभार घेण्यापूर्वीच या खात्यांची अदलाबदल करून घेतल्यामुळे त्यांच्या परत येण्याचा अधिकाऱ्यांनी धसका घेतला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
अतिरिक्त आयुक्त (शहर) पदी डॉ अश्विनी जोशी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच आयुक्तांनी अशाप्रकारे खात्यांची (BMC) अदलाबदल करत डॉ. सुधाकर शिंदे यांच्या झोळीत अधिकचे माप टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याकडील पदभारासंदर्भात गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी एक तातडीने परिपत्रक जारी झाले. ज्यामध्ये अतिरिक्त आयुक्त शहर यांच्याकडे असलेले मालमत्ता खाते, बाजार, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि उपप्रमुख अभियंता (सुधार) यांच्याशी निगडीत कामकाजाची खाती परस्पर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) उपनगरे डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे वळवली, आणि त्यांच्याकडील पर्यावरण अभियांत्रिकी संबंधीचे कामकाज आणि निवडणूक ही खाती अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणजेच डॉ अश्विनी जोशी यांच्याकडे वळवण्यात आली. डॉ.अश्विनी जोशी यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून यापूर्वी काम केलेले असून त्यांना प्रत्येक खात्याची आणि अधिकाऱ्यांची कुंडली ठाऊक आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी जोशी यांना घाबरुन ही खाती आयुक्तांना सांगून त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच वळती करून घेतली की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
आजवर अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे असलेली मालमत्ता, बाजार, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि उपप्रमुख अभियंता (सुधार) यांच्याशी निगडीत कामकाजाची खाती यापूर्वी दीड महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने (BMC) अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी.वेलरासू यांच्याकडे याचा अतिरिक्त कार्यभार असताना का अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) उपनगरे यांना देण्यात आली नाही. अश्विनी जोशी या महापालिकेत परतणार अशी माहिती मिळताच एका रात्रीत याबाबतच्या सूचना करत परिपत्रक जारी केल्याने आयुक्तांसह महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये एकप्रकारे भीती पसरलेली आहे आणि या बदलेल्या पदभारामुळे हे स्पष्ट होत आहे.
डॉ.अश्विनी जोशी यांनी यापूर्वी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) विभागाचा पदभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांनी (BMC) आरोग्य विभागासह मुंबई अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा आदींसह प्रमुख खात्यांचा कार्यभार सांभाळला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community