- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी ०२ ते ०६ डिसेंबर २०२४ दरम्यान तसेच दिनांक ११ आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबर २०२४ दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ पासून ११ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. (BMC)
उमेदवारांसाठी ०२ डिसेंबर २०२४ ते ०६ डिसेंबर २०२४ दरम्यान तसेच ११ डिसेंबर २०२४ आणि दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीदरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याठिकाणी उमेदवाराने केलेल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात आलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=MKz5s4R81lo
Join Our WhatsApp Community