BMC : पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची महापालिकेला भीती,  पंपांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच

578
BMC : पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची महापालिकेला भीती,  पंपांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच
BMC : पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची महापालिकेला भीती,  पंपांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील नालेसफाईचे काम चोख केले आणि आणि सर्व पंपिंग स्टेशन कार्यन्वित केल्यानंतरही मोठ्या पावसात काही सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता कायम आहे. अनेक भागांमध्ये  मोठ्या आणि छोट्या नाल्यांची सफाई,तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा तसेच नव्याने वाहिन्या टाकण्याची कामे तसेच सहा मोठ्या पंपिंग स्टेशनसह मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पंपांची संख्या कमी होण्या ऐवजी उलट ही संख्या वाढतच  आहे. मागील वर्षी  ३८० पंप लावण्यात आले होते,  परंतु यावर्षी तब्बल ४८१ पंप लावण्यात येत आहेत.  त्यामुळे सखल भागांमधील पाणी तुंबण्याची भीती महापालिकेला आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. (BMC)

(हेही वाचा- anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प)

यंदा जिओ टॅगिंगचा वापर 

मुंबईत जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदाही शहर आणि उपनगरात मिळून  ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त भुषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी जाहीर केले. तसेच  त्‍यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. (BMC)

तरीही पंप वाढले…

मुंबईत सध्या नालेसफाईची कामे सुरु असून छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील सफाईचे काम हे जवळपास १०० टक्क्यांच्या आसपास होत आले आहे.  तसेच सहा मोठी पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. हिंदमाता आणि मिलन सबच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त टाकी बनवून त्यातील पाणी ओहोटीच्या काळामध्ये समुद्रात सोडण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. याशिवाय वांद्रे कलानगर (Bandra Kalanagar), बीकेसी (BKC), माटुंगा गांधी मार्केटसह (Matunga Gandhi Market) इतर भागांमध्ये पाण्याच्या निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय मागील २०२१ पासून विविध पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करून अनेक सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी हजारो करोडो रुपये खर्च करण्यात आले आहे.मात्र, सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कमी झाल्याचे दिसून येत नाही.  सखल भागांमधील  तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निकालात काढण्यात महापालिकेला अपयश येत असून मागील दोन वर्षांपूर्वी जिथे ३८० पंप लावण्यात आले होते, तिथे आता महापालिका चक्क ४८१ पंप लावले आहेत. (BMC)

(हेही वाचा- PM Modi Jammu Kashmir Visit : दहशतवादाला प्रत्त्युत्तर मिळणार? पंतप्रधान थेट जम्मू-कश्मीरमध्ये जाणार)

मुंबईतील विविध भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी मुंबई महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. सन २०१७ च्या पावसाळ्यात २२५ ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले होते. या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागील कारणांच्या मुळाशी जाऊन सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना या २२५ ठिकाणांपैकी पाण्याचा निचरा होण्यास जिथे अधिक वेळ लागला अशा ८० ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आल्या. त्यानंतर मे २०१८ रोजी लोकांच्या तक्रारी नुसार पुन्हा आढावा करून पाणी साचला जाणाऱ्या ४७ ठिकाणाचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. सन २०१९ पूर्वी आणखी ८० ठिकाणे कमी करण्यात आली होती. त्यानंतर विविध उपाययोजना केल्यानंतर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या  ११२वर आली होती. जेव्हा  ११२ ठिकाणे होती, तेव्हा पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने सन २०२१मध्ये  मुंबईतील विविध भागांमध्ये ४२६ पंप बसवले होते. यामध्ये प्रत्येक वर्षी विभागाच्या सहायक आयुक्तांच्या मागणीनुसार वाढ केली जात असते. (BMC)

 मागील दोन वर्षांमधील  खर्च १०६ कोटींवर 

त्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याचा  निचरा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पंपांची संख्या कमी होणे अपेक्षित असताना मागील वर्षींच्या  तुलनेत दुपटीने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२२ व सन २०२३ या दोन वर्षांकरता ३८० पंप बसवण्यासाठी सुमारे ९३ कोटी रुपये खर्च केले होते, परंतु सन २०२२मध्ये ५५ आणि सन २०२३मध्ये ११२ पंप लावल्याने याचा तब्बल १३ कोटींचा  अतिरिक्त खर्च वाढला.त्यामुळे मागील दोन वर्षांमधील हा खर्च १०६ कोटींवर पोहोचला आणि आता पुढील सन २०२४ व सन २०२५ या वर्षांकरता विविध करांसह १३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे पंपासह त्यावरील खर्चाचाही आकडा वाढतच जाताना दिसत आहे. (BMC)

(हेही वाचा- Ajit Pawar यांच्या अडचणी वाढणार ?; Shikhar Bank Scam मधील क्लिनचीटला अण्णा हजारे देणार आव्हान)

मागील पाच वर्षांमधील पंपाची संख्या

सन २०२०मध्ये २९२ अतिरिक्त ८६ पंप  : एकूण ३८८ पंप

सन २०२१मध्ये २९२ अधिक १३४: एकूण ४२६ पंप

सन २०२२ मध्ये ३८०,  अतिरिक्त ५५ : एकूण ४३५ पंप

सन २०२३ मध्ये ३८० अतिरिक्त  ११२  : एकूण  ४९२ पंप

सन २०२४ मध्ये ४८१

सन २०२५ मध्ये  ४८१ 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.