-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना अचानक बंद पडल्यानंतर यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून अखेर निविदा अटींमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेच्या या योजनेसाठी तीन पेक्षा जास्त कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये सध्या देवू केलेल्या ८६ रुपयांच्या चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित केला असून त्यानंतरच या योजनेसाठी विविध कंपन्या पुढे आल्याचे दिसून येत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. ही निवड चार वर्षांकरता होती. परंतु डिसेंबर २०२४ पासूनच या संस्थेने पुढे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु होती. (BMC)
(हेही वाचा – मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे उघडे; DCM Eknath Shinde यांची शिवसेना उबाठावर टीका)
या निविदेमध्ये १४० चाचण्यांच्या तुलनेत नव्याने मागवलेल्या निविदेत ८० चाचण्या करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी मूलभूत चाचण्या या १०१ ऐवजी ५५ आणि प्रगत चाचण्यांसाठी ३९ ऐवजी ३५ असे प्रमाण केंले होते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटातील रकमेतील ८६ रुपये प्रति चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित करून यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये क्रस्ना डायग्नोस्टिकसह अन्य चार संस्थांनी भाग घेतला असून लवकरच यातील पात्र कंपन्यांची निवड करून त्यांच्या मार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जो कमी दर आकारणाऱ्या संस्थेची निवड केली जाईल असेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (BMC)
यापूर्वी कार्यरत असलेल्या आणि पुढे सेवा देण्यास तयार नसलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिक कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु परंतु ८६ रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या चाचण्यांकरता संबंधित कंपनीने १४१ रुपये देण्याची मागणी केली होती. जी मागणी महापालिका आरोग्य विभागाकडून मान्य करण्यात आली नव्हती. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी खात्याच्यावतीने यासाठी निविदा निमंत्रित करताना पहिल्या दोन वेळच्या प्रयत्नात जुन्याच अर्थात ८६ रुपयांचा दर निश्चित केला होता. परंतु तिसऱ्यांदा निविदा अटींमध्ये बदल करून सुधारित निविदा अटींनुसार निविदा निमंत्रित केली होती. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community