विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली.अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू मागील जानेवारी 2020 पासून अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. तब्बल चार वर्षांहून अधिक कालावधी ते अतिरिक्त आयुक्त प्रकल्प या पदावर होते, त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी मागील अनेक महिन्यापासून होत होती. (BMC)
(हेही वाचा – World Air Quality Report: जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली, भारताची हवेची गुणवत्ता तिसऱ्या क्रमांकावर)
तीन वर्षांपेक्षा जास्त कलावधी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने मंगळवारी अखेर वेलारासु यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या रिक्त जागी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर हे सध्या ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community