नेस्कोच्या कोविड सेंटरच्या भंगारातही ७८ लाखांची कमाई

कोविड काळात सुरु करण्यात आलेल्या नेस्को कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने या सेंटरच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य भंगारात निघाले आहे. त्यामुळे या साहित्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या भंगारातील सामानांच्या विक्रीतून तब्बल ७८ लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

( हेही वाचा : राज्यशासन विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ सॅनिटरी पॅड देणार! )

कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर कस्तुरबा, सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार तसेच विलगीकरणाची सुविधा केल्यानंतर ही सुविधाही अपुरी पडू लागल्याने बीकेसी, वरळी आणि त्यानंतर गोरेगाव नेस्को येथे कोविड सेंटर उभारुन रुग्णांना उपचाराची सुविधा देण्यात आली होती. यासाठी नेस्को जंबो कोविड सेंटरमधील हॉलमधील १ ते ५ आदी ठिकाणी सेंटरची उभारणी करण्यात आली होती.या सेंटरच्या उभारणीसाठी प्रामुख्याने स्टील, ऍल्यूमिनियम, नोवापॅन शिट, सिमेंट वॉल पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. परंतु आता कोविडची लाट ओसरल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी उभारलेले मंडपाचे साहित्या काढून बाजुला ठेवण्यात आले आहे. परंतु आता वर्ष उलटत आले तरी पुन्हा सेंटर उभारणीची शक्यता नसल्याने तसेच हे साहित्य अजून गंज लागू खराब होण्यापूर्वीच याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासर्व साहित्यासाठी महापालिकेने सुमारे ८३ लाख रुपयांचा महसूल अपेक्षित धरला होता. परंतु प्रत्यक्षात निविदा मागवल्यानंतर यासाठी गॅस ट्रेडींग कंपनीने कमी बोली लावून ७८लाख रुपयांमध्ये हे भंगार सामान मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.

अशाप्रकारे लागली बोली

  • एमएस स्टील : ६६ लाख ७० हजार रुपये
  • एल्युनियमम : १ लाख ९६ हजार रुपये
  • जीआय रफींग : ९ लाख ०५ हजार रुपये
  • नोवापॅन शिट : ३४ हजार रुपये
  • सिमेंट वॉल पॅनल्स : १५० रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here