BMC: गोवंडीकरांची लवकरच ‘एसएमएस’ मधून सुटका; प्रदुषणकारी जैविक कचरा प्रकल्प वर्षभरात होणार बंद

55

सचिन धानजी,मुंबई

BMC : मुंबईतील जैविक कचऱ्याची विल्हेवाट (Biological waste disposal) गोवंडी येथे शास्त्रोक्तपणे लावली जात असली तरी येत्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प बंद होणार असून पनवेलमधील जांबिवली (Ambivali Panvel) येथील जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात हा प्रकल्प कायमचाच पनवेलमध्ये स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे एसएमएस एन्वोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (SMS Envoclean Private Limited Company) माध्यमातून सुरु असलेल्या कंपनीचे पार्सलमध्ये पनवेलला पाठवण्यात येणार असल्यामुळे पूर्व उपनगरातील गोवंडी, मानखुर्दमधील प्रदुषणाचे प्रमाण अधिक कमी होण्याची शक्यता आहे. (BMC)

(हेही वाचा – साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात; CM Devendra Fadnavis यांचा सल्ला)

मुंबईतील विविध रुग्णालयांतील जैविक कचऱ्याची विल्हेवाट (Biological waste disposal)  लावण्यासाठी गोवंडीत एसएमएस कंपनीच्या (Govandi SMS Company) माध्यमातून प्रकल्प उभारण्यात आला होता. या कंपनीला महापालिकेच्या मंजुरीने २० वर्षांकरता हा प्रकल्प सुरु करण्यास मान्यता दिली होती. ही मुदत २०२९ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, येथील स्थानिक रहिवाशी आणि लोकप्रतिनिधी याला विरोध केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जुलै २०२३ मध्ये पुढील ११ महिन्यांमध्ये आवश्यक त्या परवानगी घेवून हा प्रकल्प अन्य जागी स्थलांतरीत करण्यात यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार या कंपनीला पनवेल येथील जांबिवली येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून याबाबतच्या सर्व परवानगी प्राप्त झाल्याने या प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णलयातील ५९ हजार खाटा आणि आरोग्य केद्र, प्रसुतीगृह आणि दवाखाने आदींमधील ९ हजार खाटा आदींमधील जैविक कचरा या कंपनीच्या माध्यमातून गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. याशिवाय खासगी रुग्णालय, प्रसुतीगृहे आदींमधील जैविक कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावते. महापालिकेच्यावतीने प्रति खाट १४ रुपये दराने शुल्क अदा केले जाते. त्यामुळे या कंपनीचे वर्षाला सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांची उलाढाल असून या कंपनीला स्थलांतरीत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे कार्यवाही करत आहे. त्यामुळे जागेचे सोपस्कार पार पडल्याने येत्या वर्षभरात प्रकल्प उभारणी झाल्यानंतर गोवंडी येथील प्रदुषणकारी प्रकल्प बंद होईल, असा विश्वास आहे. पनवेलमध्ये हा प्रकल्प उभारला जात असला तरी या प्रकल्पाची अत्याधुनिक पध्दतीने उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे गोवंडीप्रमाणे पनवेलमध्ये कोणत्याही प्रकारे या प्रकल्पामुळे प्रदुषण पसरणार नाही. याची काळजी घेतली जाणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखालीच हा प्रकल्प उभारला जाणार असल्याने प्रदुषण (Pollution) होणार नाही याची काळजी हे मंडळ घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – उत्तराखंड सरकार शालेय अभ्यासक्रमात Veer Savarkar यांच्यावरील धडा समाविष्ट करणार; शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांची घोषणा)

हा प्रकल्प बंद व्हावा यासाठी समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) माजी नगरसेविक रुक्साना सिध्दीकी यांनी जोरदार आंदोलन केले होते आणि याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा प्रकल्प बंद करून येथील जनतेला प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करावी अशी मागणी त्यांनी वारंवार समाजवादी पक्षाच्यावतीने केली होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.