BMC : मुंबईत घरी शौचालय बांधण्यासाठी मिळणार शासन आणि महापालिकेचे १६ हजार रुपयांचे अनुदान

658
BMC : मुंबईत घरी शौचालय बांधण्यासाठी मिळणार शासन आणि महापालिकेचे १६ हजार रुपयांचे अनुदान
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई हगणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून शौचालयांच्या उभारणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले जात असतानाच जास्तीत जास्त नागरिकांना घरोघरी शौचालय बांधण्यास प्रेरित करण्यासाठी शासनासह महापालिकेच्यावतीने अनुदान दिले जात आहे. घरोघरी शौचालयासाठी यापूर्वी महापालिकेकडून (BMC) मिळणाऱ्या अनुदानात आता वाढ केली जात असून यापुढे घरोघरी शौचालयाकरता केंद्र शासनाचे ४ हजार आणि राज्य शासनाकडून १ हजार अशाप्रकारे ५ हजार अनुदानाव्यतिरिक्त आता मुंबई महानगरपालिकेकडून ११ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्याला एकूण १६ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. (BMC)

“देशातील सर्व शहरामध्ये व ग्रामीण भागात स्वच्छता व शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ०२ ऑक्टोबर २०१४ पासून “स्वच्छ भारत अभियान १.०” हे केंद्र शासनाद्वारे राबविण्यात आले आहे. हे अभियान महाराष्ट्र राज्यात १५ मे २०१५ पासून राबवले जात आहे. त्यानुसार हे अभियान मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) राबविण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान १.० अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय घटकांतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाना केंद्र शासनाकडून ४ हजार रुपये व राज्य शासनाकडून १ हजार रुपये इतके असे एकूण ५ हजार रुपये अनुदान घरगुती शौचालयासाठी थेट लाभार्थीच्या खात्यात देण्यात येत होते. स्वच्छ भारत अभियान १.० राबवताना महानगरपलिकेचे २ हजार रुपये अनुदान मिळत होते. (BMC)

(हेही वाचा – राज्यातील १८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

परंतु यामध्ये अर्जदार जिथे राहत असेल त्यांच्या ५०० मीटर परिघामध्ये सामुदायिक शौचालय नसेल, तरच ती व्यक्ती या अनुदास पात्र होती. झोपडपट्टी वस्ती तथा चाळींमध्ये सामुहिक शौचालय उपलब्ध असल्याने या अनुदानाचा लाभ यातील जाचक अटींमुळे मिळत नव्हता. परंतु आता स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० देशामध्ये एक अभियान म्हणून राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या गृहनिर्माण तथा नागरी कार्य मंत्रालयाद्वारे २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या आहे. या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० हे एक अभियान राबविण्यास शासन निर्णयानुसार १५ जुलै, २०२२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हागणदारीमुक्त ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हे अभियान राबवण्यात येत आहे. (BMC)

शाश्वत स्वच्छता अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय या घटकानुसार नविन स्वतंत्र कुटुंबे, स्थलांतरीत कुटुंबे, सामुदायिक शौचालयांचा वापर करणारी कुटुंबे व अस्वच्छ शौचालये असणारी लाभार्थी अधिकृत तथा अनधिकृत वसाहतीमध्ये राहत असतील, तसेच अधिकृत आणि अनधिकृत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्यांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे. फक्त पूर्वीच्या स्वच्छ भारत अभियानानुसार लाभ घेतलेले लाभार्थी या अभियानात पात्र असणार नाहीत. अशी अट असली तरी पासून “स्वच्छ भारत अभियान १.०” मधील एक महत्त्वाची अट ही पासून “स्वच्छ भारत अभियान २.०” मधून वगळण्यात आली आहे. ती म्हणजे पात्र लाभार्थी अर्जदाराच्या ५०० मीटर परिघात जर सामुदायिक शौचालय असेल तर त्याला पूर्वी अनुदान मंजूर केले जात नव्हते, परंतु आता नव्या योजनेमध्ये ही अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे घरी शौचालय उभारायला लाभार्थी कुटुंबाला महापालिकेमार्फत (BMC) केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त ११ हजार एवढे अनुदान मिळणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू)

वैयक्तिक घरगुती शौचालय करिता वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च हा ३० हजार रुपये एवढा विचारात घेवून मुंबईत केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा अनुक्रमे, ४ हजार रुपये व १ हजार एवढा निधी निश्चित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेकडून (BMC) अतिरिक्त ११ हजार रुपयांचा निधी हा अनुदान स्वरुपात मिळणार असून मुंबईत घरोघरी शौचालय उभारण्यासाठी तब्बल १६ हजार रुपयांचे अनुदान शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून प्राप्त अनुदान लाभार्थी कुटुंबांना नव्याने विकसित झालेल्या पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे थेट खात्यात जमा होणार आहे. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.