-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली असून या हातगाड्या चक्क तोडून चक्काचूर केल्या. परंतु मुंबईत फेरीवाल्यांना हातगाड्या वापरण्यास बंदी असतानाही महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारे हातगाड्या जप्त केल्या जात नाही? की त्या हातगाड्या तोडून टाकत नाही? मुंबईतील रस्त्यांवर जागोजागी रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर महापालिका प्रशासन कधी कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (BMC)
मुंबईचा परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्राथमिक स्तरावर २० ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु दादरसह २० ठिकाणी असलेल्या भागांमध्ये दिखावूपणासाठी कारवाई केली जात असली तर प्रत्यक्षात येथील भाग फेरीवाला मुक्त बनला नाही. उलट याच भागांमध्ये फेरीवाल्यांच्या हातगाड्या जोरात दिसून येत आहे. या हातगाड्यांवर रस्त्यावर मिळेल तिथे उभ्या केल्या जात आहेत, त्यामुळे या हातगाड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (BMC)
(हेही वाचा – NCP च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती)
वर्षाच्या प्रारंभी केवळ सात दिवसांमध्ये ५४४ हातगाड्या जप्त करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असता तरी प्रत्यक्षात आजही मुंबईच्या रस्त्यांवर हातगाड्यांवरच खाद्यपदार्थांसह इतर वस्तूंची विक्री केली जात आहे. शिवाय मेवाड सह इतर हातगाड्यांही सर्रास रस्त्यावर आणल्या जात असल्याने, जर मुंबईत हातगाड्या लावण्यावर बंदी आहे तर मग महापालिका या हातगाड्यांवर कारवाई का करत नाही? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (BMC)
फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, हातगाड्या जप्त केल्यानंतर त्या परत दिल्या जात नाही, परंतु जप्त केलेल्या चांगल्या गाड्या या महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असलेले फेरीवाल्यांचे नेते आधीच बाजुला करून घेऊन जातात आणि ज्या हातगाड्या खराब असतात, त्याच हातगाड्या तोडून टाकल्या जातात. त्यामुळे जप्त करून गोदामामध्ये हातगाड्या घेवून जाण्याऐवजी जागीच जेसीबी अथवा बुलडोझरने तोडून टाकल्या जाव्यात. निवृत्त उपायुक्त देवेंद्र जैन हे महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असताना त्यांनी विभागातील चारचाकी गाड्या आणि बाकडे हे जप्त करून घेण्याऐवजी त्याच भागात एकत्र जमा करून त्यावर बुलडोझर चढवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे पुन्हा या हातगाड्या वशिल्याने सोडून नेणे किंवा बाकडे सोडवून नेणे हा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महापालिकेचे अधिकारी यांनी असे बाकडे आणि चारचाकी हातगाड्या जर जागीच तोडून टाकले तर मुंबईत एकही अनधिकृत गाडी लागणे किंवा बाकडे लावून धंदा लागणार नाही आणि कुणाची हिंमतही होणार नाही, असे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community