BMC Hawkers Action : चारचाकी हातगाड्या, सिलेंडरसह तब्बल ५ हजार ४३५ साहित्य जप्त

88
BMC Hawkers Action : चारचाकी हातगाड्या, सिलेंडरसह तब्बल ५ हजार ४३५ साहित्य जप्त

मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच असून ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत १८ जून ते ०४ जुलै २०२४ या गत सतरा दिवसांत विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात १ हजार १८६ चारचाकी हातगाड्या, १ हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि २ हजार ४१० इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. (BMC Hawkers Action)

New Project 2024 07 05T200133.384

मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कार्यवाही सुरू आहे. (BMC Hawkers Action)

(हेही वाचा – BMC Hawkers Action : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशालाच काँग्रेसचा विरोध)

मुंबईतील विविध विभागांमध्ये १८ जून २०२४ पासून ते ०४ जुलै २०२४ या सतरा दिवसांत झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत. (BMC Hawkers Action)

New Project 2024 07 05T200306.644

या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा तपशील खालीलप्रमाणे

जप्त साधनांची एकूण संख्या – ५,४३५

चारचाकी हातगाड्या – १,१८६

सिलिंडर – १,८३९

स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – २,४१० (BMC Hawkers Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.