18 सप्टेंबरपासून मुंबईत पोलिओ लसीकरण मोहीम

येत्या रविवारपासून मुंबईत पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. 5 वर्षांखालील अंदाजे 8 लाख 90 हजार 425 बालकांना पोलिओ प्रतीबंधक लस दिली जाणार आहे. ही मोहीम 23 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.

( हेही वाचा : गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही, पुणे महापालिकेचे आदेश )

आठवडाभर सुरु राहणा-या या मोहिमेत अंदाजे 5 हजार पालिका कर्मचारी सहभागी होणार आहे. पहिल्याच दिवशी रविवारी मुंबईत पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी 4 हजार 821 बूथ कार्यरत राहणार आहेत. तसेच या दिवशी रेल्वे स्थानके, उद्याने, विविध पर्यटन स्थळे या ठिकाणी पालकांसह भेट देणा-या लहान मुलांना 322 जण कर्मचारी लसीकरण करतील. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत ही मोहीम राबवली जाईल.

घरोघरी लसीकरण मोहीम

सोमवारी 19 सप्टेंबरपासून ते 23 सप्टेंबरपर्यंत मुंबईत घरोघरी भेट देत लहान मुलांना लसीकरण केले जाईल. पालिका आरोग्य विभागाने तब्बल 40 लाख घरांना भेटी देत लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. घरभेटीतून लहान मुलांना पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जाईल. 23 सप्टेंबर रोजी रस्त्यावर राहणा-या स्थलांतरित बेघर मुलांना पोलिओ लसीकरण दिले जाईल. या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here