BMC Health Insurance: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा वैद्यकीय गटविमा योजना, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड

9375
BMC : समुद्रात आता सोडले जाते प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी, जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे आणखी एक पाऊल
सचिन धानजी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी,कर्मचारी व कामगारांकरिता सन २०१५-१६ मध्ये तीन वर्षांकरिता लागू करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा योजना अवघ्या दोनच वर्षांत केवळ कंपनीने पुढे ही योजना चालू ठेवण्यास असमर्थता दर्शवल्याने बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली होती, तीच योजना आता पुन्हा त्याच कंपनीच्या मदतीने पुन्हा अमलात आणली जात आहे. तब्बल ७ ते ८ वर्षे केवळ विमा कंपन्यांकडून स्वारस्य दाखवले जात नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले, आता त्याच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. महापालिकेने निवड केली असून पुढील तीन वर्षांसाठी सुमारे ६०० कोटी रुपये महापालिका कर्मचाऱ्यांच्या गटविम्यावर खर्च करणार आहे. (BMC Health Insurance)

योजना बंद झाली असली तरी…

मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार,कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ पासून सेवानिवृत कर्मचाऱ्यांसाठी १ ऑगस्ट २०१५ पासून वैद्यकीय गटविमा योजना सुरु करण्यात आली होती. यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात या कंपनीने अधिक पैशांची मागणी केल्याने त्यांच्याशी केलेल्या वाटाघाटीनंतरही त्यांनी ही योजना पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्यामुळे पुढे बंद करण्यात आली. मात्र ही योजना बंद झाली असली तरी या विमा संरक्षणाच्या कवचामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय उपचारावर लाखो रुपये खर्च केले होते. उपचारावर केलेले पैसे परत मिळतील या आशेने अनेक कामगार, कर्मचाऱ्यांनी व्याजाने पैसे घेत उपचाराचा खर्च भागवला.परंतु ही योजनाच बंद झाल्याने अनेकांसमोर अडचणी येवू लागल्या होत्या. (BMC Health Insurance)

(हेही वाचा – Nashik मध्ये शिक्षक मतदारसंघातून अखेर महायुतीचे Kishor Darade विजयी)

म्हणून योजनेपासून वंचित राहिले होते…

महापालिकेचे तत्कालीन सह आयुक्त सुधीर नाईक (सामान्य प्रशासन) यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही या कंपनीने महापालिकेला कोणत्याही प्रकारचे स्वारस्य दाखवले नव्हते. या उलट तुम्ही पैसे वाढवून देणार असाल तर आम्ही विचार करतो, यावर कंपनी ठाम राहिली. मात्र महापालिका पैसे प्रशासनाने जी निधी निश्चित केला होता, त्यात मात्र या कंपनीने गट विमा योजना चालू देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आजमितीस कर्मचारी या योजनेपासून वंचित राहिले होते. या गटविमा योनमुळे योजनेमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक विमा योजना बंद केल्या होत्या. मात्र ही योजना बंद केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी पुन्हा वैयक्तिक विमा योजना सुरू केल्या. (BMC Health Insurance)

गटविमा योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे संमतीपत्र

दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक विमा योजनेचा लाभ देवून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हप्त्याची रक्कम प्रशासनाने येऊ केली होती. मात्र अनेक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक विमा योजना नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात याचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळेच महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी/कर्मचारी/कामगारांकरिता (अंशकालीन / कंत्राटी/रोजंदारीवर असणारे अधिकारी/कर्मचारी/कामगार वगळून) रु.५ लाख विमा संरक्षण असलेली वैद्यकीय गटविमा योजना सुरु करणे आणि माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर व विद्यापीठ अनुदान आयोगातील ज्या इच्छुक कार्यरत अधिकारी/कर्मचारी/कामगारांनी वैद्यकीय गटविमा योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे संमतीपत्र संबंधित कार्यालयास सादर केले आहे, अशा कर्मचा-यांच्या वेतनातून वैद्यकीय गटविमा योजनेच्या प्रिमियमची रक्कम दरमहा वसूल करण्यासापेक्ष तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाकडे प्रतिनियुक्तीवर असणारे कार्यरत अधिकारी,कर्मचारी,कामगार हे महानगरपालिका सेवेत पुनःश्च कार्यरत झाल्यानंतर त्यांना योजनेचा फायदा लागू करण्याबाबत ही योजना पुन्हा राबवण्याचे प्रशासनाने प्रस्ताविले आहे. (BMC Health Insurance)

(हेही वाचा – Lonavala येथे पर्यटकांसाठी नियमावली जारी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई)

पुन्हा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि ठरली पात्र

वैद्यकीय गटविमा योजना राबवण्यासाठी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील ४ विमा कंपन्यांकडून दरपत्रिका मागविण्यात आल्या होत्या. त्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., नॅशनल इन्शुरन्स कं.लि.. ओरिएण्टल इन्शुरन्स कं. लि., दि न्यु इंडिया अशुरन्स कं.लि., या ४ विमा कंपन्यांना विनंती प्रस्ताव पाठवून सिलबंद दरपत्रिका मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ४ विमा कंपन्यांकडून दरपत्रिका प्राप्त झाल्या.यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने ओरिएण्टल इन्शुरन्स कं. लि. आणि नॅशनल इन्शुरन्स कं. लि. यांनी केलेल्या दराच्या तुलनेत कमी दर नमूद केला.

तब्बल ९०,७०४ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विमा कवच

मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेल्या कुटुंबियांच्या संख्येच्या अर्थात ९०,७०४ कर्मचारी कुटुंब संख्येच्या माहितीच्या आधारे, या विमा कंपनीने १८९,५७, कोटी रुपये अधिक जीएसटी ३४.१२. कोटी रुपये असे २२३,६९ कोटी रूपये वार्षिक दर नमूद केला आहे. तसेच पुढील दोन वर्षाच्या नुतनीकरणाकरिता प्रतिवर्षी १८९,५७ कोटी रुपयांची प्रिमियम रक्कम नमूद केली आहे. (BMC Health Insurance)

(हेही वाचा – नेपाळमध्ये Muslim यांनी हिंदू गावाचे नाव बदलून केले ‘मोहम्मद नगर’, हिंदू तरुणालाही मारहाण)

कुणाला कसा मिळणार लाभ

कर्मचारी स्वतः, त्याची पत्नी/पती, प्रथम २ अपत्ये (मुलगा/मुलगी २५ वर्षापर्यंत किंवा विवाह होईपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल ते), आई-वडील किंवा सासू-सासरे यापैकी कोणतेही एक जोडपे (वयाच्या ९० वर्षापर्यंत) असे ६ व्यक्तींना एकूण ५ लाख रुपये एवढा विमा संरक्षण आहे.

यापूर्वीची योजना केली जाणार बंद

गटविमा योजना लागू झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेली वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी प्रिमियम रक्कम किंवा र१५००० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेच्या प्रतिपूर्तीची योजना तथा आगाऊ रक्कम देण्याबाबतची योजना बंद करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.