- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी व कामगारांकरिता बंद करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरु करण्यास मान्यता मिळाल्यानंतर येत्या १ ऑक्टोबर २०२४ पासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लिमिटेड कंपनीची निवड महापालिकेने केली असून पुढील तीन वर्षांसाठी सुमारे ६०० कोटी रुपये महापालिका कर्मचाऱ्यांच्या गटविम्यावर खर्च करणार आहे. (BMC Health Insurance)
(हेही वाचा – Tirupati Temple Prasad : प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी)
योजना बंद झाली असली तरी…
मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ पासून सेवानिवृत कर्मचाऱ्यांसाठी १ ऑगस्ट २०१५ पासून वैद्यकीय गटविमा योजना सुरु करण्यात आली होती. यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात या कंपनीने अधिक पैशांची मागणी केल्याने त्यांच्याशी केलेल्या वाटाघाटीनंतरही त्यांनी ही योजना पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्यामुळे पुढे बंद करण्यात आली होती. (BMC Health Insurance)
(हेही वाचा – Ajit Pawar 10 टक्के मुस्लिम उमेदवार देणार?)
ही योजना पुन्हा राबवण्याचे प्रशासनाने ठरवले
दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक विमा योजनेचा लाभ देवून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हप्त्याची रक्कम प्रशासनाने येऊ केली होती. मात्र अनेक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक विमा योजना नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात याचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळेच महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी/कर्मचारी/कामगारांकरिता (अंशकालीन/कंत्राटी/रोजंदारीवर असणारे अधिकारी/कर्मचारी/कामगार वगळून) रु.५ लाख विमा संरक्षण असलेली वैद्यकीय गटविमा योजना सुरु करणे आणि माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर व विद्यापीठ अनुदान आयोगातील ज्या इच्छुक कार्यरत अधिकारी/कर्मचारी/कामगारांनी वैद्यकीय गटविमा योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे संमतीपत्र संबंधित कार्यालयास सादर केले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वैद्यकीय गटविमा योजनेच्या प्रिमियमची रक्कम दरमहा वसूल करण्यासापेक्ष तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाकडे प्रतिनियुक्तीवर असणारे कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार हे महानगरपालिका सेवेत पुनःश्च कार्यरत झाल्यानंतर त्यांना योजनेचा फायदा लागू करण्याबाबत ही योजना पुन्हा राबवण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. (BMC Health Insurance)
(हेही वाचा – Manoj Saunik यांनी महारेरा अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार )
तब्बल ९०,७०४ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विमा कवच
मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेल्या कुटुंबियांच्या संख्येच्या अर्थात ९०,७०४ कर्मचारी कुटुंब संख्येच्या माहितीच्या आधारे, या विमा कंपनीने १८९,५७, कोटी रुपये अधिक जीएसटी ३४.१२. कोटी रुपये असे २२३,६९ कोटी रूपये वार्षिक दर नमूद केला आहे. तसेच पुढील दोन वर्षाच्या नुतनीकरणाकरिता प्रतिवर्षी १८९,५७ कोटी रुपयांची प्रिमियम रक्कम नमूद केली आहे. कर्मचारी स्वतः, त्याची पत्नी/पती, प्रथम २ अपत्ये (मुलगा/मुलगी २५ वर्षापर्यंत किंवा विवाह होईपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल ते), आई-वडील किंवा सासू-सासरे यापैकी कोणतेही एक जोडपे (वयाच्या ९० वर्षापर्यंत) असे ६ व्यक्तींना एकूण ५ लाख रुपये एवढा विमा संरक्षण आहे.
वैद्यकीय दाव्यांसंदर्भात कार्यवाही करण्याकरता विमा कंपनीमार्फत मेडीकल असिस्टंट टीपीए ची नियुक्ती करण्यात आली आहे. यासर्व प्रतिनिधींचे मोबाईल नंबर देण्यात आले असून रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कर्मचारी तथा कुटुंबिय यांनी मेडीकल असिस्टंट टीपीए मार्फत देण्यात आलेल्या मेडिकल कार्ड सोबत कर्मचाऱ्यांचे महापालिकेचे ओळखपत्र व संबंधित रुग्णाचे आधारकार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. (BMC Health Insurance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community