BMC Hospital : रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकांसह रुग्णालय कर्मचारी, डॉक्टरांची अरेरावी नको; बांगरांनी टोचले कान

4706
BMC Hospital : रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकांसह रुग्णालय कर्मचारी, डॉक्टरांची अरेरावी नको; बांगरांनी टोचले कान

रुग्णालय परिसरात सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नको, असे निर्देश देत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देताना सुरक्षा रक्षकांसह कोणताही रूग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स हे अरेरावी पद्धतीने वागणार नाहीत याचीही खातरजमा रुग्णालय प्रमुखांनी करावी. तसेच आवश्यक रुग्ण कक्षांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध राहील याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी सुरक्षा विभागाला मंगळवारी मार्डसोबत झालेल्या बैठकीनंतर सुरक्षा विभागाला दिल्या.

मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांची मंगळवारी (२० ऑगस्ट २०२४) रोजी बैठक घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळांने प्रामुख्याने कार्यक्षम सुरक्षा व्यवस्था, रहिवासी डॉक्टरांशी संबंधित सोयी सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, विविध चाचण्यांच्या ठिकाणची रूग्णांच्या नातेवाईकांची गर्दी यासारख्या विषयांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने केलेल्या सुचना आणि मागण्यांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. (BMC Hospital)

(हेही वाचा – CC Road : पूर्व उपनगरांतील २६१ रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदार, तरीही एम पश्चिममधील १३ रस्त्यांची स्वतंत्रे कामे हाती)

घटना किंवा प्रसंगाला हाताळण्यासाठी रुग्णालयात एसओपी

रुग्णालय परिसरात नेमण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था ही कार्यक्षम असावी. तसेच एखाद्या घटनेला किंवा प्रसंगाला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेच्या सहभाग तत्पर व प्रसंगावधान दाखवणारा अपेक्षित आहे. एखादी घटना किंवा प्रसंग घडल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने बचावली, या गोष्टीचे नियमित ऑडिट होणे गरजेचे आहे. एखाद्या घटना किंवा प्रसंगाला हाताळण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती (SOP) अंमलात आणणे गरजेचे आहे. सुरक्षा रक्षकांना कामाच्या ठिकाणी वेळोवेळी रोजच्या कामांमधून अद्ययावत स्वरूपाच्या प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे बांगर यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष

रुग्णालय परिसर हा पूर्ण सीसीटीव्ही देखरेखीखाली असेल याबाबत रुग्णालय अधिष्ठातांनी स्वतः खातरजमा करून घ्यावी. तसेच संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करून तो हाताळण्यासाठी २४ तास व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. (BMC Hospital)

(हेही वाचा – Badlapur School Case : अखेर सहा तासांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना लाठीचार्ज करून पांगवले)

सीसीटीव्ही कव्हरेजच्या स्टोरेज

या सीसीटीव्ही कव्हरेजच्या स्टोरेज व अतिरिक्त बॅकअप वेगवेगळा राहील यासाठीची व्यवस्था करावी. रुग्णालय, कॅन्टीन, कॅम्पस, कॉमन रूम, हॉस्टेल कॅम्पस, हॉस्टेल कॉमन रुम आदी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या.

ऑनकॉल कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसाठी समर्पित खोली

रहिवासी डॉक्टर ऑनकॉल कर्तव्यावर असतात त्यावेळी त्यांना समर्पित खोली उपलब्ध असावी. डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप पाहता त्याठिकाणी नियमित स्वच्छ स्वच्छतागृहांपासून सर्व सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी रुग्णालय प्रमुखांनी घ्यावी. तसेच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत वेळोवेळी सूचना आणि प्रतिसाद घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी.

(हेही वाचा – Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न!)

हॉस्टेलच्या ठिकाणी सोयीसुविधा चांगल्या…

हॉस्टेलच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा चांगल्या दर्जाच्या राहतील, याअनुषंगाने नियमितपणे उपाययोजना करावी. तसेच नियमित बैठकांद्वारे चांगल्या संवादाने हे विषय मार्गी लावावेत, अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या. येत्या दोन आठवड्यात मार्डच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. (BMC Hospital)

रुग्णाशी संबंधित कामे करण्याची जबाबदारी आया, वॉर्डबॉयचीच

रुग्णांशी संबंधित नातेवाईकांना आया व वॉर्डबॉय यांचे काम सांगितले जाते. वास्तविक ही जबाबदारी आया व वॉर्डबॉय यांचीच आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आया व वॉर्डबॉय यांचे नियमित कर्तव्याचा भाग असलेले काम हे त्यांनीच पार पाडणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत ही कामे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितली जाऊ नये. तसेच रुग्णालयाच्या ठिकाणी अनुपस्थित राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

रुग्णालयात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रुग्णसेवांमध्ये गुणवत्तात्मक आणि परिणात्मक बदलाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देणे हेच प्राधान्यस्थानी असणे गरजेचे आहे. तसेच रूग्णालयाच्या ठिकाणी योगदान देणाऱ्या डॉक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाही दर्जेदार देण्यात याव्यात, असे निर्देश बांगर यांनी दिले. आजच्या बैठकीला उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय) डॉ. नीलम अंद्राडे, सर्व प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता तसेच प्रमुख सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.