मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात असून या विद्यावेतनात १ ऑगस्ट २०२४ पासून दरमहा दहा हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह नायर दंत रुग्णालयातील २१३१ कनिष्ठ आणि ३५३ वरिष्ठ निवासी अशा प्रत्येकी तिन्ही वर्षांतील डॉक्टर तथा अधिकाऱ्यांना ही सरसकट दहा हजार रुपयांची अतिरिक्त वाढ मिळणार आहे. (BMC Hospital)
मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर, कूपर या चार प्रमुख रुग्णालयांसह नायर दंत रुग्णालय आदी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना विद्यावेतन देण्यात येते. केईएम रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर एक ते तीन मध्ये ९०० डॉक्टर असून वरिष्ठ डॉक्टरांची संख्या एकूण १७३ एवढी आहे. तरशीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण वैद्यकीय रुग्णालयांमध्ये सध्या तिन्ही वर्षांत एकूण ५६६ कनिष्ठ आणि ९० वरिष्ठ निवासी डॉक्टर आहेत. नायर रुगणालयात ४८३ आणि ९० वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या आहे. तर कूपर रुग्णालयात ११० कनिष्ठ निवासी अधिकारी तसेच नायर रुग्णालय दंत महाविद्ययात ७१ कनिष्ठ निवासी अधिकारी आहेत. (BMC Hospital)
(हेही वाचा – Sanjay Nirupam यांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल; म्हणाले…)
या सर्व वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टर तथा अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सध्याच्या विद्यावेतनात आता अतिरिक्त दहा हजार रुपयांची वाढ येत्या १ ऑगस्ट २०२४ पासून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. (BMC Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community