BMC Hospital : पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा ठप्प; १२० कोटी थकीत रकमेचा ठपका

50
BMC Hospital : पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा ठप्प; १२० कोटी थकीत रकमेचा ठपका
  • प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २७ रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनने १३ जानेवारीपासून औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेकडून १२० कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आलेली नाही, यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (BMC Hospital)

(हेही वाचा – CIDCO lottery च्या घरांचे दर होणार कमी; अध्यक्ष संजय शिरसाट यांचे संकेत)

पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाकडून निविदा प्रक्रिया किंवा दर करारांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णालये स्थानिक खरेदी आणि जुन्या करारांवर अवलंबून आहेत. यामुळे सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय होत असल्याचा आरोप पांडे यांनी केला. औषध पुरवठा थांबल्याने रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (BMC Hospital)

(हेही वाचा – मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी CM Devendra Fadnavis पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार)

पालिकेचे आयुक्त यांनी या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिले आहेत. मात्र, फाउंडेशनने मागण्या पूर्ण होईपर्यंत औषध पुरवठा थांबवण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. पालिकेच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे रुग्णांना होणारा त्रास आणि सार्वजनिक आरोग्यसेवेवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, प्रशासनाने त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.