BMC Hospital : रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि तळमळीने काम करावे!, आयुक्तांचा प्रेमाचा सल्ला

1109
BMC Hospital : रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि तळमळीने काम करावे!, आयुक्तांचा प्रेमाचा सल्ला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

आरोग्य विभागातील प्रत्येक डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी, कामगार हे अत्यंत महत्वाचा घटक आहेत. प्रत्येकाने आपली जबाबदारी तसेच नेमून दिलेले काम निष्ठेने आणि तळमळीने करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी मनापासून, निष्ठेने आणि ध्येयाने कामाची पद्धती ही इतरांना प्रेरणा ठरायला हवी, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी केले.

शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या सभागृहात आरोग्य कर्मचारी संवाद कार्यक्रमात ते सोमवारी २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बोलत होते. रुग्णालयाच्या ठिकाणी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचे उद्दिष्ट असायले हवे, असेही ते यावेळी म्हणाले. (BMC Hospital)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी)

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.

नातेवाईकांची संख्या रुग्णालयाच्या ठिकाणी मर्यादीत ठेवण्यासाठी प्रयत्न…

रुग्णालयाच्या ठिकाणी सेवा देताना रूग्णांसोबत किमान नातेवाईक उपस्थित राहतील यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय असायला हवा. डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेऊन हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एचएमआयएस) च्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या रुग्णालयाच्या ठिकाणी मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे रुग्णांना अधिक दर्जात्मक पद्धतीने सेवा देणे शक्य होईल. तसेच रुग्णसेवेत येणारे अडथळेही कमी होतील. (BMC Hospital)

(हेही वाचा – Versova Assembly Constituency : वर्सोव्यात उबाठा शिवसेनेत बंडखोरी, जो न्याय शिवडीला तोच न्याय वर्सोव्यात का नाही?)

रुग्णसेवेबाबतची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न …

सर्वसामान्यांमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णसेवेबाबतची प्रतिमा सुधारण्याच्या अनुषंगाने अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे रुग्णालयाच्या ठिकाणी आया, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडण्याची गरज आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृहे नियमित वापरात असतात. याठिकाणी सर्वाधिक प्राधान्याने स्वच्छता करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

वैद्यकीय विद्यार्थी आज जगभरात सेवा देत आहेत!

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, राजे एडवर्ड स्मारक (केईएम रूग्णालय) येथील वैद्यकीय रूग्णालयात शिक्षण घेतलेले वैद्यकीय विद्यार्थी आज जगभरात सेवा देत आहेत, ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे गगराणी यांनी नमूद केले. या रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची दखल अनेक मोठ्या देशांच्या रुग्णसेवेतील योगदानासाठी घेतल्याचेही ते म्हणाले. (BMC Hospital)

(हेही वाचा – Amit Thackeray यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट)

रुग्णशय्यांची अधिक गरज पाहता…

रुग्णशय्यांच्या अनुषंगाने रूग्णालयाच्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा. तसेच बाह्य रूग्ण विभाग तसेच सर्वसाधारण विभाग याठिकाणी रुग्णशय्यांची अधिक गरज पाहता रुग्णालयाच्या ठिकाणी यासाठीचे गरजेनुसार व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही गगराणी यांनी यावेळी दिल्या.

अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा..

मर्यादित स्त्रोत आणि उपलब्ध साधनांमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मध्यवर्ती रूग्णालयाच्या ठिकाणी औषध तुटवड्याच्या अनुषंगाने खरेदी खात्याच्या माध्यमातून ही गैरसोय कमी कशी करता येईल, यासाठीची पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी आश्वस्त केले.

(हेही वाचा – Shivadi Assembly : चौधरी, नांदगावकरांना शिवडीत टक्कर देणार शिवसेनेचा ‘हा’ उमेदवार, मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज)

म्हणून रुग्णांशी चांगला संवाद साधा!

वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून रुग्ण आणि नातेवाईकांची रुग्णालयाकडून दर्जेदार उपचारांची अपेक्षा असते. आधीच त्रासात असलेल्या रुग्णांचा तसेच नातेवाईकांचा त्रास कशा पद्धतीने कमी करता येईल, यादृष्टीने आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न असायला हवेत. म्हणूनच रुग्णांशी चांगला संवाद साधण्याची गरज आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा म्हणाले. (BMC Hospital)

रुग्णांसोबत वाद न घालता…

अनेकदा वादाच्या प्रसंगात रूग्णांसोबत वाद न घालता त्यांना समजावण्याची आपली भूमिका असायला हवी. रुग्णाला वैद्यकीय सेवा देऊन तो लवकर बरा व्हावा, हेच आपल्या सर्वांचे एकत्रित उद्दिष्ट असायला हवे. सांघिक पद्धतीने आणि नियमित संवादाने आगामी काळात वैद्यकीय सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पोहचवण्यासाठी प्रयत्न असायला हवेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.