- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना अंतर्गत सुरु असलेली चाचण्यांच्या सुविधासाठी चार वर्षांकरता कंत्राटदाराची निवड करण्यात आली. परंतु, चार वर्षांकरता करण्यात येणाऱ्या चाचर्णींचे टार्गेट आधीच संपुष्टात आले असून संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करूनही वाढीव दर आकारण्याची मागणी आणि त्यानंतर प्रशासनाची केली जाणारी अडवणूक या कारणांमुळे संबंधित सेवा देणाऱ्या कंत्राट कंपनीला आता काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच क्रस्ना डायग्नोस्टिक कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC Hospitals & Dispensary)
मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. ही निवड चार वर्षांकरता होती. (BMC Hospitals & Dispensary)
(हेही वाचा – Vishalgad Fort : विशाळगडावर जाणार्यांच्या संदर्भात पूर्ण नोंदी ठेवाव्यात; विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीची मागणी)
या कंत्राट कामांतर्गत रक्त चाचण्यांचे ८९ मुलभूत रक्त चाचण्या व ४८ विशेष तथा प्रगत रक्तचाचण्या असे वर्गीकरण करून वर्षाला पाच लाख मुलभूत रक्त चाचण्या आणि विशेष तथा प्रगत ७५ हजार रक्त चाचण्या अशाप्रकारे निश्चित केले होते. फेब्रुवारी २०२३ पासून या कंपनीमार्फत सेवा सुरु झाली असली तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची वाढती संख्या यामुळे चार वर्षांतील टार्गेट एक वर्षांच्या आतच संपुष्टात आले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कालावधी शिल्लक असल्याने वाढीव चाचण्यांकरता कंत्राटदाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. परंतु ८६ रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या चाचण्यांकरता संबंधित कंपनीने १४१ रुपये देण्याची मागणी केली. जी मागणी महापालिका आरोग्य विभागाकडून मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे यासाठी महापालिका प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबवावी लागली. परिणामी संबंधित कंपनीने चाचणी करणे बंद केल्याने याचा फटका गोरगरीब रुग्णांना होत आहे. (BMC Hospitals & Dispensary)
महापालिकेच्या आरोग्य विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निविदेचा कालावधी शिल्लक असल्याने तसेच नव्याने निविदा काढली जात असल्याने विद्यमान कंपनीला मुदतवाढ देताना त्यांना जुन्याच दराने काम करणे आवश्यक असते, त्यांना वाढीव तथा सुधारित दर देता येत नाही. तरीही संबंधित कंपनीकडून महापलिकेची अडवणूक केली जात असल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. या कंपनीला आपल्या निविदेत भाग तर घेताच येणार नाही. परंतु अशाप्रकारे प्रशासनाची अडणवूक करून रुग्णांची गैरसोय करणाऱ्या या कंपनीला काळ्या यादीत टाकले जावे अशाप्रकारचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच आयुक्तांच्या मंजुरीने पुढील निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे. (BMC Hospitals & Dispensary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community