-
सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी मोडत असल्याबाबत आरोप केला जात असतानाच ठेवी मोडणे हा अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून फार मोठा विषय आहे, असा काही भाग नाही असे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या ठेवींच्या वरती महापालिकेला फक्त दोन टक्केच व्याज मिळते. फार जास्त काही उत्पन्न मिळते अशातला काही भाग नाही. आणि म्हणून या दोन टक्के व्याजासाठी या ठेवी ठेवायच्या की मुंबईकरांना मुलभूत सुविधा चांगल्याप्रकारे देण्यासाठी या ठेवी उपलब्ध करून द्यायच्या हा आपल्यासमोरील प्रश्न आहे. त्यातून मुदत ठेवी भांडवली खर्चासाठी मोडल्या जात आहेत, असे डॉ. गगराणी यांनी स्पष्ट केली. (BMC)
(हेही वाचा – BMC : महापालिका म्हणते आता प्राथमिक सुविधांवर देणार भर; त्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय)
दादरमधील अमरहिंद मंडळाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत बोलतांना डॉ. भूषण गगराणी यांनी मुदत ठेवींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भांडवली कामांसाठी गुंतवणूक लागते त्यासाठी ठेवी मोडव्याच लागतात. ठेवी मोडणे हा अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून फार मोठा विषय आहे, असा काही भाग नाही, याचे कारण असे की या ठेवींवर आपल्याला साधारणत: साडेसात टक्के आपल्याला व्याज मिळते. पण आता सध्या चलनवाढीचा दर साडेपाच टक्के आहे. त्यामुळे जर चलनवाढीचा दर आणि व्याजाच दर पाहिला तर फरक फक्त दोन टक्के एवढाचा आहे. एवढ्या मोठ्या ठेवींच्या वरती महापालिकेला फक्त दोन टक्केच व्याज मिळते. फार जास्त काही उत्पन्न मिळते अशातला काही भाग नाही आणि म्हणून या दोन टक्के व्याजासाठी या ठेवी ठेवायच्या की मुंबईकरांना मुलभूत सुविधा चांगल्याप्रकारे देण्यासाठी या ठेवी उपलब्ध करून द्यायच्या हा आपल्यासमोरील प्रश्न आहे, असे आयुक्तांनी सांगितले. (BMC)
(हेही वाचा – BMC : केंद्राच्या अधिनियमांची अंमलबजावणी; पण मार खाते महापालिका)
तर भांडवली गुंतवणूक मोठ्याप्रमाणात करतानाच महापालिका कर्मचाऱ्यांची सुविधा, सुरक्षा म्हणजे त्यांचे वेतन, त्यांचे भत्ते तसेच पेन्शन याला बाधा येणार नाही. महापालिकेची जी मूलभूत कर्तव्ये आहेत. म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य याच्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी अर्थातच घ्यायला पाहिजे. म्हणून सगळ्या भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च कराव्या असे नाही. पण त्याच वेळेला सर्व ठेवी ठेवून केवळ दोन टक्के कमवावे असेही नाही. तर कुठेतरी सुवर्णमध्य आपल्याला गाठावा लागेल आणि ठेवीच्या सुरक्षेची काळजी करूनच महापालिका यासर्व खर्चाचे नियोजन करत आहे, असे गगराणी यांनी नमुद केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community