- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ही बाब मार्गी लागली असून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाबही आता मार्गी लागली आहे.
(हेही वाचा – Dadar Hawkers : दहा वर्षांपूर्वीच्या सर्वेमध्ये १११ पात्र मुस्लिम फेरीवाले, आज त्यांच्यामुळेच दादरमध्ये वाढले मुस्लिम)
महानगरपालिका (BMC) अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=aNa509o4uiw
Join Our WhatsApp Community