- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने कोणत्याही इमारतीला अथवा चाळी तथा झोपडपट्टीतील नागरिकांना जलजोडणी घ्यायची असल्यास त्यांना परवानाधारक प्लंबरच्या मदतीशिवाय जोडणी घेता येत नाही. परवानाधारक प्लंबरच्या माध्यमातून किंवा त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणत्याही नगारिकाला महापालिकेच्यावतीने जलजोडणी घेता येत नाही. परंतु या परवानाधारक प्लंबरच्या परवाना नोंदणी शुल्क, अनामत रक्कम आणि परवाना शुल्क तथा वार्षिक नूतनीकरणाच्या शुल्कात मागील २००५ पासून कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसाला जलजोडणी मिळवून देण्यासाठी हजारो रुपये उकळणाऱ्या परवानाधारक प्लंबरच्या शुल्कात वाढ न करता मागील १९ वर्षांपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अभय दिल्याचे दिसून येत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या जलअभियंता खात्यात नळ जोडणी परवाना हा प्लंबरना दिला जातो आणि परवानाधारक प्लंबरच्या माध्यमातूनच महापालिकेची जलजोडणी घेण्यासाठी नागरिक अर्ज करतात. हा परवाना मिळवण्यासाठी प्लंबरना आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर संबंधितांच्या मंजुरीने एक वर्षांसाठी नळजोडणी परवाना दिला जातो आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक असते. या परवाना प्लंबरच्या नोंदणी, अनामत रक्कम आणि वार्षिक नोंदणी शुल्कांसाठी प्रत्येकी ५०० रुपयांची रक्कम ऑगस्ट २००५ रोजी स्थायी समिती व विधी समितीच्या माध्यमातून मंजुरी दिली होती. परंतु त्यानंतर आजतागायत या शुल्क आणि अनामत रक्कम वाढण्यात येत नव्हती. (BMC)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण)
आजवर इमारत, सोसायटींकडून तसेच चाळ आणि झोपडपट्ट्यांमधून पाच ते पंधरा कुटुंबांसाठी बंच कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केला जातो. हा अर्ज परवानाधारक प्लंबरच्या माध्यमातून करुन जलजोडणी घेतली जाते. या जलजोडणीसाठी परवानाधारक प्लंबर हे नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम देण्याची मागणी करतात. परवानाधारक प्लंबर कधी जलजोडणी देण्यासाठी तर कधी पी फॉर्मवर केवळ आपली स्वाक्षरी देण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करता. त्यामुळे हजारो रुपये जलजोडणीसाठी वसूल करणाऱ्या परवाना प्लंबरना शुल्क आणि अनामत रक्कमेसाठी केवळ प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारले जाते, आणि त्यात मागील १९ वर्षांपासून कोणतीही वाढ न करता त्यांना अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
महापालिका जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजवर परवानाधारक प्लंबरना नोंदणी शुल्कासाठी ५०० रुपये, अनामत रक्कम म्हणून ५०० रुपये आणि वार्षिक नुतनीकरण शुल्क म्हणून ५०० रुपये शुल्क हे सन २००५पासून आकारले जात आहे. यात १९ वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. जर एक वर्षांच्या परवाना संपुष्टात आल्यानंतर त्या परवान्याचे नुतनीकरण न केल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येते. तसेच तीन वर्षांत नुतनीकरण न केल्यास नुतनीकरण करताना मागील तीन वर्षांत १ हजार रुपये प्रमाणे दंड वसुल करण्यात येतो. परंतु आता या शुल्कात ५०० रुपयांऐवजी २००० रुपये रक्कम केली जाणार असून याला महापालिकेची प्रशासकांची मंजुरीही प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community