विशेष प्रतिनिधी,मुंबई
कुलाबा सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी पाणी नेव्ही आणि आर्मी अशा केंद्र शासनाच्या विभागाना पुरविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कुलाबा विभागातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागाच्या संस्थाना महापालिकेमार्फत १७ दशलक्ष लिटर पिण्याचा पुरवठा जल विभागामार्फत करण्यात येतो. आता या विभागाना अजुन ३.५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या विभागांना अतिरिक्त साडेतीन दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या उभारण्यात आलेला कुलाबा मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र हे एप्रिल २०२० पासून सुरु करण्यात आले आहे. या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून कुलाबा विभागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन प्रतिदिन सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. प्रक्रिया केलेले हे पाणी मरीन ऑऊट फॉल द्वारे समुद्रात सुमारे १.१५ कि.मिटर अंतरावर सोडले जाते. (BMC)
आणखी पाण्याची मागणी
केंद्र शासनाच्या कुलाबा विभागातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागाच्या संस्थाना महापालिकेमार्फत १७ दशलक्ष लिटर पिण्याचा पुरवठा जल विभागामार्फत करण्यात येतो. परंतु या विभागाना अजुन ३.५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. ती पुर्ण करण्यासाठी महापालिकेचे मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागामार्फत एम.एस.डी.पी अंतर्गत सुयझ इंडिया प्रा.लि. या कंपनीने नव्याने उभारण्यात आलेल्या कुलाबा सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्र येथील प्रक्रिया केलेले सांडपाणी घेण्यास या विभागांनी सहमती दर्शविली आहे. (BMC)
(हेही वाचा – BMC : राजा उदार झाला, महापालिकेच्या हाती येणार भोपळा )
एक रुपया नामनात्र दराने पाणी पुरवठा
केंद्र शासनाच्या कुलाबा विभागातील नेव्ही आणि आर्मी सरंक्षण विभागाच्या संस्थांनी कुलाबा उदंचन केंद्राच्या (मेनगेट) मुख्यद्वारा पासुन ते नेव्ही आणि आर्मी सरंक्षण विभागाच्या भुमीगत टाकी पर्यत पाईप लाईन स्वःखर्चाने टाकण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले हे पाणी नाममात्र शुल्क या तत्वावर एक रुपया प्रती १ हजार लिटर दराने दिले जाणार आहे.
पिण्याच्या पाण्यात बचत
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रती एक हजार लिटरसाठी १ रुपयांचा दर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कुलाबा विभागातील नेव्ही, आर्मी विभागांच्या संस्थांना पिण्यासाठीच्या पाण्यासाठी खर्च करावा लागणार असून प्रक्रिया केलेले पाणी त्यांच्याकडून खरेदी केले जात असल्याने त्यांचा वापर पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरला जाते. परिणामी त्यांची शुध्दीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्यात बचत होत आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रात न सोडता नजिकच्या मोठ्या ग्राहकांना विकल्यास त्यातून महापालिकेला महसूल प्राप्त होत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community