BMC : वांद्र्यात महापालिकेचे स्वतंत्र कर्करोगाचे रूग्णालय; कंत्राटदाराची निवड

304
Clerk Recruitment : महापालिकेत १८४६ कार्यकारी सहायक पदांच्या जागांसाठी १,११,३५८ अर्ज

मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्यावतीने स्वतंत्र कर्करोगाचे रुग्णालय बांधण्यात येत आहे. वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयाजवळ हे दहा मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत असून १६५ खाटांच्या या सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी आता महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल २१३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)

कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईमध्ये असलेल्या ‘टाटा’ रुग्णालयात मुंबई आणि मुंबई बाहेरील कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची खूपच गर्दी होत असते. सध्या मुंबईत कॅन्सरसेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. मुंबई सेंट्रलजवळील नायर रुग्णालय हे रेडिएशन थेरपी देणारे एकमेव नागरी केंद्र आहे. तसेच केईएम रूग्णालयात काही खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. (BMC)

त्यामुळे महापालिकेने टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे सर्व सेवा सुविधायुक्त कर्करोगाचे स्वतंत्र रुग्णालय वांद्र्यात उभारले जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर रोडवरील कर्करोग रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे आराखडे तयार केले असून यात तळघर १ अधिक २ तळमजला असे १० मजल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये तळघर १ ते ८ मजले रुग्णालय असेल आणि ९ व १० मजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असेल. या कामांसाठी ए एन सी पी एल-शेठ या संयुक्त भागीदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह २१३ कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. या रुग्णालयाचे बांधकाम ३६ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. (BMC)

(हेही वाचा – पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट; व्हिडिओ व्हायरल होताच Central Railway ला जाग)

रुग्णालयात असतील ‘या’ सुविधा 

यात केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोगाची काळजी घेणारे हे अद्ययावत रुग्णालय असेल. या रुग्णालयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे १३ हजार चौरस मीटरच्या बांधकाम क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत १२ ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांसह पाच प्रयोगशाळा असणार आहेत. डायग्नोस्टिकमध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्सदेखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन असेल. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वसतिगृहासारखी सुविधा निर्माण केली जाणार आहे. (BMC)

वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे, अशी कल्पना स्थानिक आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेकडे मांडली होती. पालिकेने ही मागणी मान्य करत रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा बनवण्याचे काम हाती घेतले होते, त्यानुसार आता या रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू होत आहे. तर काही वर्षांपूर्वी भाजपाचे आमदार अमित साटम यांनी अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय हे कर्करोगाचे सर्व सेवा सुविधा युक्त रुग्णालय सुरू करावेत अशी मागणी केली होती. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.