- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने आपत्कालिन प्रसंगी नौदलाच्यावतीने पाणबुड्यांची मदत घेतली जाते. परंतु महापालिकेच्यावतीने पाणबुड्यांची मदत घेताना त्यांच्या जिवाची सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या या पाणबुड्यांना विमा सुरक्षा कवच पुरवले जात असून प्रत्येकी ५ लाखांचा विमा काढला जात आहे. (BMC)
(हेही वाचा – नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प; Amitabh Bachchan यांनी केले आवाहन)
मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळ्यात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यांवर बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी आपत्कालिन विभागातर्फे नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात येते. मुंबईतील निर्माण होणारी पूर परिस्थिती, मॅनहोल्स, नदी, तलाव, तसेच विहिरींमध्ये तसेच समुद्रामध्ये बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी जिथे अग्निशमन दलाचे जवान तसेच एनडीआरएफचे जवान कमी पडतात तेव्हा नौदलाच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात येते. (BMC)
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या पुतळ्याला काँग्रेसकडून विरोध; भाजपचे सुनील कोळी म्हणतात; विरोध करणारी व्यक्ती खरोखर हिंदू आहे का?)
एक वर्षांच्या कालावधीकरता १० नौदल पाणबुड्यांची सेवा घेतली जाते. मागील मान्सूनपूर्व बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी पाणबुड्यांना विमा सुरक्षा कवच पुरवण्यात यावेत अशाप्रकारचे निर्देश दिले होते, त्यानुसार महापालिका आपत्कालिन व्यवस्थापन विभागाने दहा नौदलाच्या पाणबुड्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला यासाठी नियुक्ती करण्यात आले. यासाठी १ कोटी २३ लाख ९०० रुपये कंपनीला अदा करण्यात आले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community