BMC : मुंबईत डोक्यावर वाहून मैला नेला जातो का? त्रयस्थ संस्था करणार महापालिकेच्या कामांचे सर्वेक्षण

173
BMC : मुंबईत डोक्यावर वाहून नेला जातो का मैला? त्रयस्थ संस्था करणार महापालिकेच्या कामांचे सर्वेक्षण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील शहर आणि उपनगरांमध्ये डोक्यावर मैला वाहून नेणारे कामगार (मेहतर) चे सर्वेक्षण २०१३ मध्ये करण्यात आले होते. त्यावेळेस मुंबईत हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांची एकही नोंद झाली नव्हती. असे असले तरीही, एका याचिकेच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबईत डोक्यावर मैला वाहून नेणारे कामगार (मेहतर) यांचे सर्वेक्षण ६ ऑक्टोबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

या सर्वेक्षण कालावधीत (शनिवार व रविवार वगळता) कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० विभाग कार्यालयातील सहायक मुख्य पर्यवेक्षक (घनकचरा व्यवस्थापन) यांच्याशी संपर्क साधावा किंवा भेट घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसिद्धीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Manholes : मलवाहिन्यांच्या साफसफाईचा मार्ग मोकळा; ‘त्या’ सात वाहनांच्या देखभाली आणि प्रचालनासाठी सुमारे १७ कोटींचा खर्च)

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या विषयाच्या निमित्ताने नुकतीच रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे सचिव यांनी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचित केले आहे. या निर्देशानुसार मुंबईत या सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे.

या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एका त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच पथनाट्याच्या माध्यमातूनही या कामगारांच्या विषयाची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सर्वेक्षण अंतर्गत नाव नोंदवण्यासाठीची जाहीर सूचना प्रत्येक विभागातील शौचालय, सेक्शन चौकी, मोटर लोडर चौकी आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. (BMC)

(हेही वाचा – Manholes : मलवाहिनींच्या जीएस मॅपिंग सर्व्हेतच त्रुटी: तब्बल १३ हजारांहून मॅनहोल्स हे मॅपिंगमध्ये जुळत नाहीत)

हाताने काम करणारा मेहतर व अनारोग्यकारी शौचकुपी यांची व्याख्या

हाताने काम करणारा मेहतर याचा अर्थ मैला पूर्णपणे कुजण्यापूर्वी अनारोग्यकारी शौचकुपामधील किंवा उघड्या नाल्यातील किंवा अनारोग्यकारी शौचकुपापासून मैला ज्या खड्ड्यात टाकला जातो, तेथून मानवी मैला हाताने साफ करणारी, तो वाहून नेणारी, काढणारी किंवा अन्यथा कोणत्याही रितीने हाताळणारी, अशी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाद्वारे किंवा सरकारी किंवा खासगी प्राधिकरणाद्वारे कामावर लावलेली किंवा सेवा नियुक्त केलेली व्यक्ती असा आहे, आणि हाताने केले जाणारे मेहतर काम या शब्दप्रयोगाचा अर्थ तदनुसार लावण्यात येईल.

सफाई कर्मचारी

यामध्ये सामान्यपणे महानगरपालिका शासकीय किंवा खासगी कार्यालये यामध्ये सफाईगार किंवा स्वच्छता तथा सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो. ते या (महानगरपालिका) शासकीय तथा खासगी क्षेत्रातील संघटना मंडळाचे प्रत्यक्ष कर्मचारी असू शकतात किंवा कंत्राटी कर्मचारी असू शकतात. जे या संघटनेकरिता काम करतात, ते सफाई कर्मचारी हे स्वतः हाताने काम करणारे मेहतर नसतात. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.