BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ

440
BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ
  • मुंबई, (सचिन धानजी)

रस्त्यांच्या विविध कामांसाठी जिथे सल्लागार नेमले जातात, तिथे रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंता कार्यालयासाठीच आता सल्लागार नेमण्याची वेळ आली. रस्ते विभागाच्या कार्यालयीन मदतीसाठीच खासगी सल्लागाराची सेवा घेतली जात असून विविध प्रकल्प कामांचे अहवाल बनवण्याबरोबरच खड्डे आणि खोदलेले चर आदींबाबतच्या तक्रारीसाठी डॅशबोर्ड बनवण्यासाठीही सल्लागार सेवा घेतली जाणार आहे. या सल्लागार सेवेसाठी तीन वर्षांकरता तब्बल १ कोटी १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)

(हेही वाचा – Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींची संख्या १३ लाखांनी वाढली; कमी झाल्याची केवळ अफवा)

मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्यावतीने विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या विविध रस्त्यांवर युटीलिटीज संस्थांमार्फत चर खोदण्याचे काम सुरु असते. शिवाय रस्त्यांवरही पावसाळ्यात खड्डे पडत असतात. अशा मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माहिती तथा डेटांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रमाणिक डॅशबोर्ड आणि अहवाल तयार करण्यासाठी या संबंधित विभागाला मदत करण्यासाठी समर्पित प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची आवश्यकता असल्याने यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी या सल्लागाराची निवड करण्यात येत असून यासाठी १ कोटी १५ लाख रुपये वर्षासाठी खर्च केला जाणार आहे. (BMC)

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार का?; भाजपा गटनेते Pravin Darekar यांचा सरकारला सवाल)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता यांच्या कार्यालयात पूर्णवेळ हा सल्लागार नेमण्यात येणार असून कार्यकारी अभियंता स्वीय, प्रमुख अभियंता रस्ते व वाहतूक यांना अहवाल बनवून देण्यास मदत करेल आणि तीन विभागीय कार्यालयांमधील एक सहायक कर्मचारी संबंधित उपप्रमुख अभियंता रस्ते यांना अहवाल बनवून देण्यास मदत करेल, असे या सल्लागार सेवेचे स्वरुप असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी एबेल सॉफ्टवेअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC)

(हेही वाचा – आता दुर्गम भागातही रोबोटिक शस्त्रक्रिया होणार: Tele-Robotic Surgery घराजवळ सुविधा देणार)

सल्लागाराचे काय असेल काम?
  • प्रत्येक प्रकल्पासाठी समस्या आणि अडथळ्यांच्या मागोवा घेणे आणि निराकरणासाठी पाठपुरावा करणे.
  • प्रकल्प आराखड्याची देखरेख आणि पूर्णत्वाचा कालमर्यादा ठरवणे.
  • तांत्रिक प्रगतीबद्दल माहिती ठेवणे.
  • डॅशबोर्ड व्यवस्था करणे आणि खड्डे व्यवस्थापन प्रणालीसाठी प्लॅटफॉर्म डिझाईन करणे.
  • विविध विभाग आणि प्रशासनाला लागणारी सादरीकरणे तयार करणे.
  • मुख्य अभियंता (रस्ते व वाहतूक) विभागाला विविध स्वरुपाची पत्रे तयार करण्यासाठी मदत करेल आणि टंकलेखन सेवा प्रदान करेल. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.