पश्चिम उपनगरातील खार सब वे आणि मिलन सब वेच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत असून सध्या या सब वेमधील पाणी जास्त काळ तुंबून राहत नसले तरी तुंबणारे सब वेच अशीच यांची ओळख आहे. मात्र, या सब वेमधून जाताना त्याठिकाणच्या बकाल भिंती आणि परिसराला रंगरंगोटीसह आकर्षक चित्रे आणि इतर झाडांची सजावट आदींच्या माध्यमातून सुशोभिकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या सब वेच्या ठिकाणी पाणी तुंबत असले तरी इतर वेळी मात्र याठिकाणांहून प्रवास करताना प्रत्येकाच्या मनाला आनंद वाटेल अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
(हेही वाचा – NCP : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंबईतील विविध भागांचे सौदर्यीकरणाची काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. पदपथांचे सुशोभिकरण आणि सुधारणा,रस्त्यांवरील फर्निचर व रोषणाई,स्कायवॉकची प्रकाश दिवे, पुलांचे सुशोभीकरण, तसेच भिंत पेंटींगची कामे घेण्यात आली. त्यानुसार मिलन सब वे आणि खार सब वे येथील सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने मागवलेली निविदेमध्ये साई सिध्दी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या सुशोभीकरणासाठी ४ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एकमेव कंपनी पुढे आली होती आणि या कंपनीचीच निविड करण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीची निवड नियमबाह्य असल्याचेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community