- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेने आता शाळांमधील मुलांना पारंपारिक शिक्षण पद्धतीतून बाहेर काढून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पद्धतीवर भर दिला असून अशाप्रकारची सुरुवात बाल्यावस्थेतून सुरु होत असल्याने महापालिकेने बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपेटी अर्थात जादुई पिटारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक बालवाडीसाठी दोन जादुई पिटारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी वर्ग सुरु करण्यात आले. सध्या महापालिकेच्या माध्यमातून ११३९ बालवाड्या सुरु आहेत. या सर्व बालवाड्यांमध्ये सुमारे ४०,००० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ११३९ बालवाड्यांकरता प्रति बालवाडी उपलब्ध करून दिले जाणार असून प्रति जादुई पिटाराकरता महापालिकेच्यावतीने साडेसात हजार रुपये मोजले जाणार आहे. त्यामुळे २२७८ जादुई पिटाराकरता सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा – ED : ६४० कोटींच्या Cyber Fraud सह क्रिप्टो, जुगार आणि सट्टेबाजी संबंधित मोठा कट उघड)
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कृतीशील अध्यापन पध्दतीवर महापालिकेने भर दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षण पध्दतीतून बाहेर काढून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती राबविण्यावर भर देण्यात आलेला आहे. खरे तर शिक्षणाची सुरुवात बाल्यावस्थेत म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते. या वयाच्या बालकांसाठी एक व्यवस्थित अशा स्वरूपाचे शैक्षणिक किट तयार करण्याचा निर्धार करून त्यातून जादुई पिटारा (ज्ञानपेटी) या संकल्पनेचा उदय झाला असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (BMC)
ज्ञानपेटी अर्थात जादुची पेटी ज्यातून विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला, कृतीशिलतेला वाव देऊन त्यांना आनंददायी शिक्षण देता येईल. या पेटीचा वापर ३ ते ६ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी करता येईल. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांकरीता ‘जादुई पिटारा’ (ज्ञानपेटी) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)
(हेही वाचा – शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण)
बालवाडीतील मुलांसाठी लेखन आणि वाचन साहित्य
मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने स्कूल किट्स व गणवेश देण्यात येतात. तसेच सन २०२०-२१ पासून महापालिका शिक्षण विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळा सध्या बालवाडी ते इयत्ता ९ वी पर्यंत सुरु आहेत. या शाळांतील पूर्व प्राथमिक (नर्सरी ते सिनीयर केजी.) विद्यार्थ्यांकरीता लेखन व वाचन साहित्य पुरविण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर महानगरपालिकेच्या अन्य बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांकरीताही वाचन व लेखनसाहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community