BMC : कामगार नेत्यांना आचारसंहितेची भीती; दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याची समन्वय समितीच्या नेत्यांची आयुक्तांकडे मागणी

196
BMC : कामगार नेत्यांना आचारसंहितेची भीती; दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याची समन्वय समितीच्या नेत्यांची आयुक्तांकडे मागणी
BMC : कामगार नेत्यांना आचारसंहितेची भीती; दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याची समन्वय समितीच्या नेत्यांची आयुक्तांकडे मागणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महानगर पालिकेतील कामगार कर्मचारी-अधिकाऱ्यांना  दिवाळी निमित्त देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदान (बोनस) बाबत निर्णय घेवून हे अनुदान दिवाळी सणापूर्वी देण्यात  यावे अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विविध कामगार  संघटनेच्या समन्वय समितीच्या  नेत्यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (BMC)
मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, परिचारिका, परिसेविका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलातील कर्मचारी इत्यादी कायम कामगारांबरोबर महानगरपालिकेतील विविध खात्यातील कंत्राटी, रोजंदारी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरोग्य खात्यातील कंत्राटी कामगार, सी.टी.सी. बोरीवली रुग्णालयातील कर्मचारी, आर. सी. एच.२, एनयुएचएम कर्मचारी, मुंबई एड्स कंट्रोल सोसायटी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका व मदतनीस, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान मधील कंत्राटी कामगार, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी तसेच आरोग्य खात्यातील स्वयंसेवी आरोग्यसेविका (सी.एच. व्ही.) यांना एकूण वार्षिक वित्तलब्धीच्या किमान २०% सानुग्रह अनुदान (बोनस) म्हणुन देण्यात यावा असे मागणीचे मागणीचे निवेदन आज मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वा. मा. महानगरपालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले आहे. (BMC)
या भेटीच्यावेळी समन्वय समितीच्या नेत्यांनी  महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणुन दिले की, या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी २३७ कोटींच्या रक्कमेची तरतुद करण्यात आलेली असून दरवर्षी कर्मचाऱ्यांना पहिल्या वषपिक्षा वाढीव रक्कमेने सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची प्रथा आहे.   यावर्षीही बोनसमध्ये भरघोस अशी वाढ करण्यात यावी अशी विनंती केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका . कामगार कर्मचारी-अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) बाबत निर्णय होऊन त्यांना दिवाळी सणापूर्वी देण्यात यावा अशी विनंतीही महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे समन्वय समितीच्या नेत्यांकडून करण्यात आली. (BMC)
त्यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी याबाबत लवकरच समन्वय समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावेळी महापालिका आयुक्त व समन्वय समितीच्यावतीने  बाबा कदम (Baba Kadam), वामन कविस्कर, अशोक जाधव (Ashok Jadhav), प्रकाश देवदास (Prakash Devdas),  दिवाकर दळवी (Diwakar Dalvi),  सत्यवान जावकर,  के. पी. नाईक, साईनाथ राजाध्यक्ष,  बा. शि. साळवी, श्री. शरद सिंह इत्यादी समन्वय समितीचे नेते उपस्थित होते.  (BMC)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.