महापालिकेची प्रयोगशाळा होणार अद्ययावत : होणार १४ निकषांनुसार नमुन्यांची तपासणी

184

मुंबईतील अन्न आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी असलेली प्रयोगशाळा आता अद्ययावत केली जाणार आहे. सध्या या महापालिकेच्या प्रयोगशाळेत पाण्याच्या नमुन्यांचे ०८ निकष अर्थात पॅरामिटर तपासले जातात. या तपासणीसाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. परंतु ही प्रयोगशाळा अद्ययावत केल्यानंतर पाण्याच्या नमुन्यांचे एकूण १४ निकष तपासता येणार आहे आणि पूर्वीपेक्षाही वेळ कमीत कमी लागणार आहे.

( हेही वाचा : मंदौस चक्रीवादळामुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट)

मुंबईतील महापालिकेसह विविध भागांमधील पाण्यांचे तसेच अन्नांचे नमुने तपासण्याची एकमेव महापालिकेची प्रयोगशाळा जी उत्तर विभाग कार्यालयात आहे. या महापालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये खासगी गृहनिर्माण संस्थांमधील पाण्याचे नमुने शुल्क आकारुन तपासले जाते. याशिवाय जलतरण तलावाच्या पाण्याचे नमुने आणि बांधकाम व्यावसायिकांच्या पाण्याचे नमुनेही शुल्क आकारुन तपासले जातात. सध्या आकारल्या जाणाऱ्या नमुन्यांच्या तपासणीसाठी चार दिवसांचा कालावधी लागत असून विविध संस्थांकडून तसेच जलतरण तलाव व खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून पाण्याच्या नमुन्यांचे इतरही निकष तपासून पाहण्यासाठीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात या प्रयोगशाळेद्वार विविध प्रकारचे सुमारे ७० हजार पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. सध्या या प्रयोगशाळेत पाण्याच्या नमुन्यांचे ०८ निकष तपासले जातात. वेगवेगळ्या यंत्रांद्वारे ही तपासणी होत असल्याने या नमुन्यांच्या तपासणीसाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे तपासणीसाठी लागणारा जास्तीचा कालावधी आणि नमुन्यांची तपासणींची मागणी लक्षात घेता महापालिकेने या प्रयोगशाळेत मल्टीपॅरामीटर वॉटर ऍनलायझर यंत्रणेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रयोग शाळा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये ही तपासणी १४ नमुन्यांद्वारे केली जाणार असून यासाठी लागणारा कालावधीही कमी होणार आहे. शिवाय वेळेची आणि मनुष्यबळाचीही बचत होणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत ही तपासणी करून तपासणीकरता येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढेल आणि महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल असा विश्वास महापालिकेच्या प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.