किरीट सोमय्या एसीबीच्या कार्यालयात पोहचले आहे. तिथे मुंबई पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक खाते वरळी कार्यालयात दहिसरचा 1 हजार 722 कोटींच्या मुंबई महापालिका भूसंपादन घोटाळाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बिल्डर अल्पेश अजमेरा यांनी 2.55 कोटीत जमीन खरेदी केली. महापालिकेने ३४९ कोटी रुपये पेमेंट केले. बिल्डरने न्यायालयात अपील दाखल केले. १ हजार ७२२ कोटी भरपाईची मागणी केली आहे. (व्याजासह) आजपासून दहिसर भूखंड घोटाळ्याची अधिकृत चौकशी सुरु झाली आहे. बोरिवलीत तक्रार दाखल केली आहे. विकासक अल्पेश अजमेरा यांनी 2 कोटीत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन घेतली. बिल्डरने 1700 कोटी रुपये व्याजासह देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. प्रथम दर्शनी हे अधिकाऱ्यांना दिसत आहे. मंत्रालयात चौकशीसाठी अधिकारी परवानगी मागणार आहे. मातोश्रीवर घोटाळ्याचे पैसे पोहचवण्यासाठी हे केले, तत्कालीन जिल्ह्याधिकारी यांना हे माहीत होते. या प्रकरणी लोकायुक्त, कॅगला तक्रारी दिल्या. मुंबई पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आपले म्हणणे नोंदवून घेण्यात आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
(हेही वाचा IPL 2023 Final Match : महिलेने पोलिसाच्या मुस्कटात लगावली; सामन्याऐवजी याचीच चर्चा रंगली)
Join Our WhatsApp Community