महापालिकेच्या 11 सीबीएसई स्कूलला मंडळाची मान्यता

180

मुंबई महापालिकेच्या शाळांना लागलेल्या गळतीनंतर शिक्षण पध्दतीत बदल करत सीबीएसई मंडळाची शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पण महापालिकेच्या शाळांना सीबीएसई मंडळाची मान्यता आहे का? त्या अधिकृत आहेत का? याबाबत पालकांच्या मनात भीती होती. पण आता पालकांनी महापालिकेच्या या सीबीएसई शाळांमध्ये मुलांना बिनधास्तपणे पाठवावे. महापालिकेच्या सुरू करण्यात आलेल्या ११ सीबीएसई शाळांना बोर्डाने संलग्नता दिली आहे. त्यामुळे या बोर्डाच्या शाळांमध्ये मुलांना खुशाल पाठवायला हरकत नाही.

New Project 4

जोगेश्वरीत पहिली शाळा सुरू झाली

जोगेश्वरीतील पुनम नगर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सीबीएई मंडळाची पहिली शाळा सुरु करण्यात आल्यानंतर आता महापालिकेच्यावतीने येत्या शैक्षणिक वर्षांपासून अन्य १० शाळांमध्ये या मंडळाचे शालेय शिक्षण देण्याचा निर्णय घेत मुलांना प्रवेश दिला होता. तत्कालीन सहआयुक्त आशुतोष सलील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी राजू तडवी, संगीता तेरे यांच्या टीमने या शाळा सुरू करून युवासेना प्रमुख आणि विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला होता.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

या शाळांना सीबीएसई बोर्डाची संलग्नता मिळावी म्हणून सलील यांनी मार्च महिन्यापासून पत्रव्यवहार सुरू केला होता. परंतु विद्यमान अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि सह आयुक्त अजित कुंभार यांनी यासाठीचा पाठपुरावा पुन्हा केल्यानंतर या मंडळाची संलग्नता बुधवारी प्राप्त झाली आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर वरून ही माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.