आता सोमय्या मैदानावर नवीन जंबो कोविड सेंटर!

कांजूरमार्ग येथे जुन्या क्रॉम्पटन ग्रीवजच्या जागी, शीव येथे सोमय्या मैदानात तर मालाड अशा तीन ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने सल्लागार नियुक्त केले आहेत.

100

मुंबईतील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आता मुंबई महापालिका प्रशासनाने सध्या असलेल्या जंबो कोविड सेंटरसह काही समर्पित कोरोना काळजी केंद्रांमधील क्षमता वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आता शीव येथील सोमय्या मैदानाच्या जागेवर नवीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या कोविड सेंटरच्या निर्माणासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडसह याठिकाणी सुमारे ५०० हून अधिक रुग्णखाटांचे केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरु आहे.

मालाड येथे नवीन जंबो कोविड सेंटर सुरु करण्याचाही निर्णय!

मुंबईमध्ये सध्या वांद्रे पूर्व येथील बीकेसी मैदान, वरळीतील एनएसआयसी, गोरेगाव नेस्को या जंबो कोविड सेंटरसह विविध समर्पित कोरोना काळजी केंद्रांमध्ये बाधित रुग्णांवर उपचार केला जात आहे. परंतु वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता एनआयसीयमध्ये रुग्ण खाटा वाढवण्यात आली आहे. याशिवाय पोद्दार आणि नेहरु विज्ञान केंद्रांमध्येही रुग्ण खाटा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, आता विद्यमान बीकेसी आणि नेस्को या दोन दोन जंबो कोविड सेंटरचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच आता शहरामध्ये शीव सोमय्या मैदान, कांजूरमार्ग आणि मालाड येथे नवीन जंबो कोविड सेंटर सुरु करण्याचाही निर्णय अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! घरी परतणाऱ्या परप्रांतीयांना दिले बोगस कोरोना निगेटिव्ह अहवाल! )

सेंटरची जबाबदारी एमएमआरडीए किंवा सिडको देणार!

त्यामुळे कांजूरमार्गला जुन्या क्रॉम्पटन ग्रीवजच्या जागी, तर शीवला सोमय्या मैदानाच्या जागी आणि मालाडला तीन ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्याच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सल्लागार नियुक्त केले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी किती रुग्ण खाटांचे सेंटर बनवली जावी, याचा आराखडा तयार केला जात आहे. मात्र, शीव येथील सोमय्या मैदानाच्या जागेवर ५०० हून अधिक रुग्ण खाटांचे सेंटर बनवले जाणार असून यामध्ये २०० हून अधिक ऑक्सिजन बेडची सुविधा असेल अशाप्रकारची व्यवस्था असेल. या सेंटरची जबाबदारी एमएमआरडीए किंवा सिडको यांच्यावर सोपवली जाणार आहे. या दोन्ही पैकी एका प्राधिकरणाने या केंद्राची उभारणी केल्यानंतर यासाठी एका रुग्णालयाची निवड करून त्यांच्यावर या केंद्राच्या देखभालीची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमय्या मैदानाच्या जागेत ही व्यवस्था झाल्यास पूर्व उपनगरातील कोविड बाधित रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. सोमय्या मैदान आणि कांजूरमार्ग येथे ही दोन सेंटर होणार असल्याने पूर्ण उपनगरामधील लोकांना याचा योग्यप्रकारे उपयोग होवू शकतो. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीचे जंबो सेंटर उभारणीत मोठे योगदान आहे. त्यामुळे या अनुभवाच्या आधारे त्यांनी अन्य सेंटरची उभारणी कमीत कमी वेळेत उभारणी करण्यात ते यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे लवकरच ही व्यवस्था रुग्णांना उपलब्ध होणार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.