बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज बुधवार, दिनांक १५ मे २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली. पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. (BMC)
आधी बसवलेल्या पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर ही तुळई बसविणे आव्हानात्मक होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Amit Saini) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Ashwini Joshi), व्यवस्थापकीय संचालक (मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ) आश्विनी भिडे (Ashwini Bhide), उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर (Chakradhar Kandalkar), प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम (Girish Nikam), मांतय्या स्वामी (Mantaiah Swami), ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता प्रकल्प स्थळी उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा- PM Narendra Modi : माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, पण…; पंतप्रधानांनी मुलाखतीवेळी केलेल्या ‘या’ विधानाची चर्चा)
आज स्थापन केलेली तुळई ही नरिमन पाईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची असून १४३ मीटर लांब आणि ३१.७ मीटर रुंद आणि ३१ मीटर उंच आहे. (BMC)
उर्वरित कामे पूर्ण करून लकवकरच मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा सुरू होईल. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community