वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत, मुंबईतही परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता नवी नियमावली तयार केली आहे. ज्या सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडतील त्या सोसायटीला ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.
काय आहे नवी नियमावली!
- कोणत्याही सोसायटीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर संबंधित सोसायटी सील केली जाणार.
- संबंधित सोसायटीच्या बाहेर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून फलक लावण्यात येणार.
- तसेच बाहेरील व्यक्तीला सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- मायक्रो कंटेन्मेंट झोन बाबतच्या सर्व नियमांचे पालन करणे हे संबंधित सोसायटीची जबाबदारी असणार.
- या नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी १० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वेळी २० हजार रुपये दंड आकाराला जाणार.
- संबंधित मायक्रो कंटेन्मेंट झोनकडे एक पोलीस तैनात राहणार.
- वर्तमानपत्र, दूधवाला, खाद्य पदार्थ इत्यादी डिलिव्हरी बॉयला सोसायटीत प्रवेश दिला जाणार नाही.
- संबंधित वस्तू गेटच्या बाहेर ठेवून त्या संबंधित फ्लॅटच्या मालकापर्यंत पोहचवण्याची यंत्रणा सोसायटीने तयार करावी.
- केवळ वैद्यकीय तातडी आणि बोर्डाची परीक्षा या कारणांसाठीच सोसायटीतील नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी.
- लक्षणे नसलेला मात्र होम क्वारंटाईन असलेला कोरोनाबाधित रुग्ण सोसायटीत फिरत असेल तर गुन्हा दाखल होईल.
- महापालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मायक्रो कंटेन्मेंट झोनला भेट द्यावी.
(हेही वाचा : राज्याच्या मदतीला धावून आले केंद्रीय पथक! आता कोरोनाची शंभरी भरली?)
Join Our WhatsApp Community