यंदा मुंबईतील ३८१ मंडळांकडे गणपती आलाच नाही!

यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेकडे सुमारे ३ हजार १०४ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले होते.

86
यंदाच्या वर्षीही महापालिका आणि मुंबई पोलिसांनी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना कडक धोरण अवलंबिले. त्यामुळे यंदाच्या वर्षी तब्बल ३८१ मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली.

३ हजार १०४ अर्ज आले होते!

यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेकडे सुमारे ३ हजार १०४ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यातील ५८४ अर्ज हे डबल होते म्हणून नाकारण्यात आले, त्यामुळे उर्वरित २ हजार ५२० अर्जाची छाननी करण्यात आली. त्यातील १४३ अर्ज के प्रलंबित ठेवण्यात आले, तर ३८१ मंडळांना सपशेल परवानगी नाकारण्यात आली. त्यातील २ अर्ज वाहतूक पोलिसांनी तर ११ अर्ज हे मुंबई पोलिसांनी नाकारले आहेत.

घाटकोपर परिसरात सर्वाधिक मंडळांना परवानगी! 

महापालिकेच्या ६ वॉर्डांपैकी गिरगाव, ग्रांट रोड परिसर असलेल्या डी वॉर्डात १२९ गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर दादर, शिवाजी पार्क परिसरातील जी – नॉर्थ वॉर्डात १२३, अंधेरी परिसरातील के – वेस्ट मध्ये ११७, चेंबूर, गोवंडीतील एम – ईस्ट मध्ये १०७, घाटकोपर भागातील एन वॉर्डात १३७, तर भांडुपच्या एस वॉर्डात १०७ गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.